गाळपात ‘बारामती अ‍ॅग्रो’, उत्पादनात ‘माळेगाव’ अग्रस्थानी; साखर उतार्‍यात व्यंकटेशकृपा कारखाना अव्वल | पुढारी

गाळपात ‘बारामती अ‍ॅग्रो’, उत्पादनात ‘माळेगाव’ अग्रस्थानी; साखर उतार्‍यात व्यंकटेशकृपा कारखाना अव्वल

पुणे : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात 16 पैकी 15 साखर कारखाने बंद झाले असून, केवळ भोर तालुक्यातील राजगड सहकारी साखर कारखान्याचे ऊसगाळप अद्याप सुरू आहे. ऊसगाळपात ’बारामती अ‍ॅग्रो’ या खासगी, तर साखर उत्पादनात ’माळेगाव सहकारी’ आणि साखर उतार्‍यात ‘व्यंकटेशकृपा’ या खासगी कारखान्यांनी अग्रस्थान पटकाविले आहे. ऊसगाळपाच्या चालू वर्ष 2021-22 मध्ये आजअखेर 16 साखर कारखान्यांनी मिळून 1 कोटी 54 लाख 15 हजार 200 मेट्रिक टन इतके उच्चांकी ऊसगाळप पूर्ण केलेले आहे. तर, 10.67 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 1 कोटी 64 लाख 43 हजार 335 क्विंटल इतके साखरेचे उत्पादन तयार केल्याची माहिती पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक धनंजय डोईफोडे यांनी दिली.

पुणे जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सुमारे दीडशे लाख मेट्रिक टन इतके उच्चांकी ऊसगाळप होण्याचा अंदाज होता. तो खरा ठरला असून, त्यापेक्षा अधिक गाळप कारखान्यांनी केलेले आहे. जिल्ह्यात केवळ राजगड सहकारी साखर कारखान्याचा ऊसगाळप हंगाम सध्या सुरू आहे. या कारखान्यास अतिरिक्त उसाचे गाळप करण्यासाठी अनिवार्य ऊस आदेश देण्यात आलेला आहे. त्यानुसार किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याकडील (ता. वाई, जि. सातारा) अतिरिक्त पाच हजार मे. टन उसाचे गाळप करण्याचे आदेश 18 मे रोजी साखर आयुक्तांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

’बारामती अ‍ॅग्रो’ या खासगी काखान्याने 17 लाख 31 हजार 60 मेट्रिक टन इतके उच्चांकी ऊसगाळप करीत अग्रस्थान पटकाविले आहे. मात्र, 9.25 टक्के साखर उतार्‍यानुसार 16 लाख 1 हजार 600 क्विंटल इतके साखर उत्पादन तयार केले आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याने 15 लाख 2 हजार 890 मेट्रिक टन इतके ऊसगाळप पूर्ण केले आहे. तर, 11.32 टक्के सरासरी उतार्‍यानुसार जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 17 लाख 1 हजार 600 क्विंटल इतके साखरेचे उत्पादन तयार केले आहे. तर, ’व्यंकटेशकृपा’ या खासगी कारखान्याने 7 लाख 12 हजार 355 मेट्रिक टन ऊसगाळप केले असून, 8 लाख 37 हजार 50 क्विंटल इतके साखर उत्पादन तयार केले आहे. या कारखान्याचा साखर उतारा जिल्ह्यात अव्वल म्हणजे 11.75 टक्क्यांइतका मिळाला आहे.

कारखाना -ऊसगाळप(मेट्रिक टन) – साखर उत्पादन (क्विंंटल) -उतारा (टक्के)
श्री सोमेश्वर- 1325395- 1552600 -11.71
दी माळेगाव- 1502890- 1701600- 11.32
श्री छत्रपती- 1251795- 1371800- 10.96
विघ्नहर- 1143211- 1223800- 10.70
कर्मयोगी- 1112490- 1068000- 9.60
राजगड- 137044- 127925 -9.33
श्री संत तुकाराम- 58836-2 671650- 11.42
घोडगंगा- 630981- 699000- 11.08
भीमाशंकर- 1186426- 1351220- 11.39
निरा-भीमा- 717670- 645150- 8.99
श्रीनाथ म्हस्कोबा- 80650-5 734570- 9.11
अनुराज शुगर- 504790- 530000- 10.50
बारामती अ‍ॅग्रो- 1731060- 1601600- 9.25
दौंड शुगर- 1237460- 1377400- 11.13
व्यंकटेशकृपा- 71235-5 837050- 11.75
पराग अ‍ॅग्रो- 826777- 949970- 11.49
एकूण- 1,54,15,200- 1,64,43,33- 5 10.67%

Back to top button