पुणे : पूर्ववैमनस्यातून शिवणे येथे गोळीबार; एक जखमी | पुढारी

पुणे : पूर्ववैमनस्यातून शिवणे येथे गोळीबार; एक जखमी

पुणे/वारजे; पुढारी वृत्तसेवा:  पुणे- वारजे येथील शिवणे परिसरामध्ये काळ्या रंगाच्या कारमधून निघालेल्या तरुणावर अज्ञातांकडून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे. केदार शहाजी भालशंकर (वय २७, रा. रामनगर लक्ष्मी चौक वारजे) असे त्‍याचे नाव आहे.

केदार हा आपल्या कारने रविवारी (दि.८) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पुणे-वारजे येथील शिवणे रस्त्यावरून घरी जात होता. याच दरम्यान अचानक त्याच्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्‍यात आला. यात त्याच्या पाठीला गोळी लागली असून तो जखमी झाला. यानंतर त्याला उपचारासाठी एका खासगी रूग्णालयात दाखल केले.

याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्वीच्या झालेल्या भांडणातून ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा: कोकणी खेकडा फ्राय रेसिपी माहीत आहे का?

Back to top button