पुणे : सायबर पोलिस ठाण्याला नवी ऊर्जा | पुढारी

पुणे : सायबर पोलिस ठाण्याला नवी ऊर्जा

अशोक मोराळे

पुणे : शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाणे विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत आहे. आयसीआयसीआय बँकेच्या सीएसआर फंडातून येथे 16 किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे.

गुड न्यूज! मान्सून अंदमानात दाखल, ५ दिवस अगोदरच केरळमध्ये धडकणार

विजेबाबात स्वयंपूर्ण होणारे शहरातील हे पहिलेच पोलिस ठाणे ठरले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून महिन्याला सरासरी 2 हजार युनिट वीजनिर्मिती होणार आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर विजेची टंचाई भासत आहे. यावर उपाय म्हणून महावितरणने शहरासह ग्रामीण भागात सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यास प्रोत्साहन दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील सायबर पोलिस ठाण्याने सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा संकल्प केला. हा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आयसीआयसीआय बँकेच्या सीएसआर फंडाचे सहकार्य घेतले आहे. त्यानुसार या पोलिस ठाण्यात 16 किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभा राहत आहे. प्रकल्पामुळे शासनाच्या पैशाची मोठी बचत होणार आहे.

काँग्रेस आगामी मनपा निवडणुकीत राबविणार एक परिवार, एक तिकीट धाेरण : नाना पटोले

वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी.एस. हाके यांनी सांगितले की, विजेच्याबाबतीत स्वयंपूर्ण होणारे शहर पोलिस दलातील हे पहिलेच पोलिस ठाणे असावे. महिन्याकाठी येथे दोन हजार युनिट वीजनिर्मिती होणार आहे. पोलिस ठाण्याच्या विजेची गरज पूर्ण होण्याबरोबरच येथील वेल्फेअर इमारतीलादेखील वीजपुरवठा होणार आहे. वेल्फेअर इमारतीत जीम, अभ्यासिका आहे. तसेच शिल्लक राहणारी वीज महावितरणला विक्री केली जाणार आहे. सायबर पोलिस ठाण्याचे बहुतांश काम संगणकाच्या माध्यमातून चालते. त्यामुळे सर्व संगणकांना बॅकअप सुद्धा मिळणार आहे. प्रकल्पाचे सर्व काम झाले असून, दोन ते तीन दिवसांत त्याला सुरुवात होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Back to top button