

नारायणपूर : पुढारी वृत्तसेवा : किल्ले पुरंदर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित आज (शनिवार) सकाळी ७.३० वाजता आमदार संजय जगताप यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी दौंड-पुरंदरचे प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रूपाली सरनोबत, पुरंदरचे गटविकास अधिकारी अमर माने, नायब तहसीलदार सुर्यकांत पठाडे आदी उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव सोहळा समितीच्या वतीने सकाळी १० वाजता महाराज यांच्या मूर्तीची मिरवणूक, छबिना, ढोल पथक व विविध मर्दानी प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
हेही वाचलंत का ?