सावित्रीबाई फुले पुणे वद्यिापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदी डॉ. काळे

सावित्रीबाई फुले पुणे वद्यिापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदी डॉ. काळे

पुणे : पुढारी वृत्तसेवा

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी विश्वनाथ काळे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदी नियुक्ती केली जाणार आहे,' अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

'नवीन कुलगुरूंची निवड ही नवीन कायद्यानुसारच होणार आहे. त्यासाठीचा नवीन शैक्षणिक कायद्याचा मसुदा सहीसाठी राज्यपालांकडे पाठविण्यात आला आहे. त्यांची स्वाक्षरी झाली की त्यानुसार नवीन कुलगुरूंची निवड होईल,' असे त्यांनी सांगितले.

सामंत म्हणाले, 'नवीन कायद्याच्या मसुद्यात केवळ कुलगुरू पदाचा विषय नाही. अधिसभा सदस्य तसेच व्यवस्थापन परिषद सदस्यांना, शैक्षणिक पात्रतेचे बंधन घालण्यात आलेले आहे. त्याचबरोबर समान संधी मंडळ देखील स्थापन करण्यात येणार आहे. मराठी भाषेचे संचालक प्रत्येक विद्यापीठात असावेत, अशा विविध बाबींचा कायद्याच्या मसुद्यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कायद्यावर लवकर स्वाक्षरी व्हावी.'

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news