पिंपरी : उन्हामुळे भाज्या कडाडल्या | पुढारी

पिंपरी : उन्हामुळे भाज्या कडाडल्या

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : इंधन दरवाढीचा परिणाम भाज्यांवर होत असतानाच आता तीव्र उन्हामुळे भाज्यांच्या पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक घटली असून भाज्यांच्या दरात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. फळभाज्यांसह पालेभाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे.

Mouni Roy : समुद्राच्या वाळूत पाय रोऊन मौनीचे हॉट फोटोशूट

गेल्या महिन्याभरात इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च महागला होता. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी भाज्यांच्या दरात वाढ केली होती. मात्र, आता उन्हाच्या तीव्र झळांमुळे महाराष्ट्रात लागवड होणार्‍या भाज्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे.

दादा, प्रांताधिकारी ५ लाख मागताहेत ; सभेत शेतकऱ्याची अजित पवारांकडे तक्रार

त्यामुळे चाकण, मोशी येथील भाज्यांची आवक 30 ते 40 टक्क्यांनी घटली आहे. याचा परिणाम म्हणून भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.
जिल्ह्याामध्ये खेड, जुन्नर, आंबेगाव, मावळ, मुळशी याठिकाणी मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांची लागवड केली जाते.

जमशेदपूर : टाटा स्टील प्लांटमध्ये स्फोट होऊन लागली भीषण आग

काही ठिकाणी पुरेशा प्रमाणात पाण्याची सोय असल्याने ऐन उन्हाळ्यातही भाजीपाल्याचे उत्पादन होते; मात्र उन्हाच्या तीव्र झळांमुळे भाजीपाल्यावर परिणात होत आहे. परिणामी भाज्याच्या दरात वाढ होत आहे.

अभिषेक बॅनर्जींची पत्नी रुजीराविरोधात वारंट

किरकोळ बाजारात मेथी, पालक, कोथिंबीर आणि शेपू या भाज्यांच्या दरात 8 ते 12 रुपयांनी वाढ झाली असून सध्या किरकोळ बाजारात 12 ते 20 रुपयांनी या भाज्यांची विक्री केली जात आहेत.

पालेभाज्यांनंतर फुलांना देखील उन्हाची झळ बसली आहे. उन्हामुळे फुले लवकर सुकतात. त्यामुळे फुलांची मागणी घटली आहे; तसेच आवक रोडावली असून फुलांच्या दरात वाढ झाली आहे. उन्हामुळे फुलांचा ताजेपणा टिकून
राहत नाही,’

-राजू कांबळे, विक्रेते

’इतर भाज्यांच्या तुलनेत पालेभाज्यांनाउन्हाचा मोठा फटका बसू लागला आहे. त्यामुळे पालेभाज्यांची आवक 60 टक्क्यांनी घटली आहे’,
-सुधाकर पडवळ,पालेभाजी विक्रेते

भाज्यांचे दर

मिरची – 160 ते 200 रुपये किलो
हिरवा वाटाणा – 200 रुपये किलो
गाजर – 100 रुपये किलो
चवळीच्या शेंगा – 200 किलो
पालक – 20 रुपये जुडी
कोथिंबीर – 20 रुपये जुडी

 

Back to top button