नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाले पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांचे भाचे अभिषेक बनर्जी (Rujira Banerjee) यांची पत्नी रुजीरा बनर्जी यांच्याविरोधात जामीनपात्र वारंट बजावला आहे. सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) वारंवार समन्स बजावून देखील तपासात सहकार्य न केल्याने रुजीरा यांच्याविरोधात वारंट जारी करण्यात आला आहे. कोळसा तस्करी संबंधी ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास केला जात आहे. याप्रकरणी हा वारंट काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
(Rujira Banerjee) मुख्य न्यायदंडाधिकारी स्निग्धा सरवरिया यांनी ईडीच्या याचिकेवर हे आदेश जारी केले आहेत. पुढील सुनावणी २० ऑगस्टला करण्यात येईल. ईडीने नोव्हेंबर २०२० मध्ये सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारे संबंधित गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने बंगाल मधील कुनुस्तोरिया तसेच कोजोरा, आसनसोल जवळील ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड च्या खाणीमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
कोळसा घोटाळ्यातला पैसा अभिषेक यांच्यापर्यंत पोहोच झाल्याचा तपास संस्थांचा संशय आहे. अभिषेक यांच्या पत्नी रुजीरा यांनाही ईडीने चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स मार्च महिन्यात पाठविण्यात आले होते. हवाला प्रतिबंधक कायदा २००२ नुसार ईडीने बॅनर्जी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईस्टर्न कोलफिल्ड कंपनीच्या खाणींतून अवैधपणे खणन करण्यात आलेल्या कोळशाचा पैसा बॅनर्जी यांना प्राप्त झाला असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. कोळसा खनन माफिया अनुप मांझी हा या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे.
हेही वाचलंत का ?