

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा : ग्रीस येथे सुरु असलेल्या ज्युनिअर जागतिक वेटलिफ्टींग स्पर्धेत वडगांव मावळ नगरपंचायतच्या कर्मचाऱ्याची मुलगी व दूबेज गुरुकुल ची खेळाडू,
हर्षदा शरद गरुड हिने ४५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावून वेटलिफ्टिंगची पंढरी असलेल्या वडगांवचे नाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर झळकावले.
हर्षदा शरद गरुड ही वडगांव मावळ येथील दुबेज गुरुकुलमध्ये क्रीडा प्रशिक्षक बिहारीलाल दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून तिने सन २०१९ मध्ये ताशकंद येथे झालेल्या आशियाई ज्युनिअर स्पर्धेत कास्य पदक मिळविले होते.
हर्षदाने तिची निवड योग्य असल्याचे सिद्ध केल्या बद्दल बिहारीलाल दुबे यांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान हर्षदाच्या या यशाचे संपूर्ण मावळ तालुक्यातून विशेष कौतुक होत आहे.
https://youtu.be/xzUCzCdKjCQ