कर्नाटकातील भाजप नेत्या दिव्या हागारगींना पुण्यातून अटक | पुढारी

कर्नाटकातील भाजप नेत्या दिव्या हागारगींना पुण्यातून अटक

पुणे, पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकातील पोलीस उपनिरीक्षक भरती घोटाळा प्रकरणी कर्नाटक राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) भाजपच्या नेत्या दिव्या हागारगींना शुक्रवारी (दि. 29) पुण्यातून अटक केली. भरती घोटाळ्यात कर्नाटकातील सीआयडीच्या पथकाने यापूर्वी 17 जणांना अटक केली होती. तर दिव्या या घोटाळ्यातील मुख्य आरोपी असून, गेल्या काही दिवसांपासून त्या फरार होत्या.

या प्रकरणात दिव्याचा पती राजेश याला अटक करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर दिव्या फरारी झाली होती. ती पुण्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर कर्नाटक पोलिसांच्या पथकाने तिला अटक केली. भरती घोटाळा प्रकरणात याचिका दाखल करण्यात आली होती. कर्नाटकातील न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर कर्नाटकातील सीआयडीच्या पथकाने आरोपींचा शोध सुरु केला. कर्नाटकाचे गृहमंत्री अरगा जनानेंद्र यांनी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.

गुलबर्गा येथील कनिष्ठ न्यायालयाने भाजप नेत्या दिव्यासह सहा जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने तो फेटाळून लावला. दिव्या कर्नाटकातील कलबुर्गी येथील भाजपच्या महिला विभागाच्या अध्यक्षा होत्या.

हेही वाचा  

Back to top button