पुणे-नाशिक महामार्गावर आयशर टेम्पोला आग | पुढारी

पुणे-नाशिक महामार्गावर आयशर टेम्पोला आग

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा

पुणे-नाशिक महामार्गावर आयशर टेम्पोला आग लागली. आळेफाट्याजवळ मंगळवारी (दि. २६) मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत जीवितहानी झाली नसल्याचे स्पष्ट झाले. पण या घटनेमुळं महामार्गावर काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती.

पुणे येथून आयशर टेम्पो (क्रमांक एम.एच ०४ ई.एल ७७३४) पुठ्ठा घेऊन नाशिककडे जात होता. आळे फाट्याच्या पुढे आळेखिंड परिसरात या वाहनाला आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यांनी वाहन थांबवून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच आळे फाटाचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी योग्य त्या सूचना दिल्या. या भयंकर आगीत काही वेळातच संपूर्ण टेम्पो जळून खाक झाला. महामार्गावर नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची काही वेळ कोंडी झाल्याने पोलिसांनी या दुर्घटनेनंतर पुणे-नाशिक अशी वाहतूक एकेरी वळवली.

हेही वाचलतं का? 

Back to top button