हरितपट्टा अतिक्रमणमुक्त ठेवण्याचे पुणे पालिकेसमोर आव्हान | पुढारी

हरितपट्टा अतिक्रमणमुक्त ठेवण्याचे पुणे पालिकेसमोर आव्हान

पुणे : पुढारी वृत्तसेवा

सर्व प्रकारचा दबाव झुगारून महापालिका प्रशासनाने नदीपात्रालगतच्या आणि म्हात्रे पूल ते राजाराम पूल यादरम्यानच्या डीपी रस्त्यालगतच्या अतिक्रमणांवर कारवाई केली. मात्र, हरितपट्टा अतिक्रमणमुक्त ठेवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
दर पंधरा दिवसांनी पाहणी करून झालेल्या अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा, तुफान दगडफेक करत प्रवाशांना लुटले, सिग्नलला कापड बांधून दरोडेखोरांचा हैदोस

महापालिकेत प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतर प्रशासनाकडून शहरात अतिक्रमणविरोधी कारवाई राबविली जात आहे. या कारवाईअंतर्गत महापालिकेच्या बांधकाम आणि अतिक्रमणविरोधी पथकाने स्थानिक पातळीसह राज्य आणि देशपातळीवरील राजकीय मंडळींसह धनाढ्य लोकांचा राबता असणार्‍या डीपी रस्त्यावरील लॉन्स, हॉटेल आणि इतर मिळकतींवर बुधवारी कारवाई केली. यामध्ये 20 जेसीबी, 12 गॅसकटर, 8 ब्रेकर, 200 बिगारी, 25 पोलिस, 100 सुरक्षारक्षक, 15 अतिक्रमण निरीक्षक अशा मोठ्या फौजफाट्यासह 68 मिळकतींवर कारवाई करून 4 लाख 3 हजार चौरस फूट क्षेत्र मोकळे केले.

कोरोना अपडेट | देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ, २४ तासांत २,४५१ नवे रुग्ण, ५४ मृत्यू

शहरातील अशा प्रकारची ही पहिलीच मोठी कारवाई होती. अनेक राजकारण्यांच्या जवळच्या व्यक्तींसंदर्भातील ही अतिक्रमणे होती. लग्नसराईचा महिना असल्यामुळे आता पुन्हा या ठिकाणी अतिक्रमणे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाला पुन्हा अतिक्रमणे उभी राहणार नाहीत यासाठी डोळ्यांत तेल टाकून लक्ष ठेवावे लागणार आहे.

लालपरी पुन्हा सुसाट! ९० टक्के एसटी कर्मचारी कामावर रुजू

दरम्यान, महापालिकेच्या कारवाईनंतर गुरुवारी या ठिकाणी पत्रे, लोखंडी पाइप, बांबू, ताडपत्र्या आदी साहित्य वेगवेगळे करण्याचे व ते साहित्य वाहनांमध्ये भरून इतर ठिकाणी हलविण्याचे काम सुरू होते. उच्च न्यायालयाने येथील कारवाईला आहे तशी परिस्थिती ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, तर काही मिळकतींच्या कारवाईवर स्थगिती दिली आहे.

नवाब मलिकांना आणखी एक दणका, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

स्थगिती दिलेल्या मिळकती

  • कृष्णसुंदर लॉन्स, विष्णूजी की रसोई,
  • पी. के. बिर्याणी, पाइन वूड, जीएसडी
  • फर्निशिंग, सचिन नाईक, सिंहगड चौपाटी, पलंगे बिर्याणी.

नाशिक : 18 गुंठे ज्वारीच्या पिकात पक्ष्यांचा मुक्त संचार; दुष्काळात दिलासा

न्यायालयाने काही मिळकतींवरील कारवाईला स्थगिती दिली आहे. न्यायालयाची स्थगिती उठल्यानंतर न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल, तसेच कारवाईनंतर त्या ठिकाणी दर पंधरा दिवसांनी पाहणी करून पुन्हा अतिक्रमण करणार्‍यांची बांधकामे तसेच शेड जमीनदोस्त करण्यात येतील.

                                                 – बिपिन शिंदे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग

Back to top button