एका दिवसात डाऊनलोड झाले १ लाख सात-बारा!

एका दिवसात डाऊनलोड झाले १ लाख सात-बारा!

पुणे : पुढारी वृत्तसेवा

राज्याच्या महसूल विभागाच्या ई-फेरफार प्रकल्पांतर्गत 18 एप्रिलला म्हणजे एका दिवसात 87 हजार नागरिकांनी एक लाख दोन हजार डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारे आणि मिळकतपत्रिका ऑनलाइन डाऊनलोड केल्या आहेत. राज्यातील आतापर्यंतचा हा उच्चांक आहे.

ई-फेरफार प्रकल्पांतर्गत आतापर्यंत फक्त डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा आणि आठ-अ उतारे नागरिकांना डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होते. आता मात्र, मिळकतपत्रिकादेखील ऑनलाईन मिळू लागली आहे. सरकारी योजनांचा लाभ, पीककर्ज, जमिनीची खरेदी विक्री यासाठी सातबारा उतार्‍यांबरोबर खाते उतारे हे आवश्यक असतात. हे खाते उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त मिळू लागले आहेत. त्यानुसार एका दिवसात एक लाख दोन हजार डिजिटल स्वाक्षरीत सातबारा आणि खाते उतारे; तसेच मिळकतपत्रिका ऑनलाइन डाऊनलोड करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 76 हजार 69 सातबारा उतारे आहेत.

ऑनलाईन उतारे आणि मिळकतपत्रिका मिळण्याची सुविधा

जमाबंदी आयुक्तालयाने संकेतस्थळावरून ऑनलाइन पैसे भरून डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा, आठ-अ उतारे आणि मिळकतपत्रिका डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सरकारी कामकाजासाठी हे उतारे ग्राह्य धरले जातात. संकेतस्थळावर विनाशुल्क डिजिटल स्वाक्षरी नसलेले, पण माहितीसाठीचे उतारे उपलब्ध आहेत.

एका दिवसात मोठ्या संख्येने डाऊनलोड झालेले उतारे

  • 14 फेब्रुवारी 2022 – एक लाख
  • 16 जून 2021 – 62 हजार
  • 7 एप्रिल 2021 – 38 हजार
  • 16 मार्च 2021 – 40 हजार 200
  • 22 फेब—ुवारी 2021 – 46 हजार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news