जेजुरीतील चिंचेची बाग पारंपारिक ‘गोंधळा’ने ‘फुलली’! | पुढारी

जेजुरीतील चिंचेची बाग पारंपारिक ‘गोंधळा’ने ‘फुलली’!

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देवाच्या जेजुरीगडाच्या पायथ्याशी भाविकांना कुलधर्म कुलाचार करता यावे, यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्याकाळी चिंचेची बाग निर्माण केली होती. ही ऐतिहासिक चिंचेची बाग देवकार्यासाठी दररोज हाउसफुल होत आहे.

थेट सुप्रिया सुळेंसमोर राजेश टोपेंकडून शिवसेनेच्या दोन मंत्र्यांवर आरोप

ऐतिहासिक काळात येथे जेजुरी गड, पायरी मार्ग, दीपमाला, कमानी, होळकर तलाव, पेशवे तलाव, चिंचेची बाग बांधण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जेजुरी गडाचा जीर्णोद्धार केला. यात गडाच्या पायथ्याजवळ सुमारे पंधरा एकर जागेत भव्य आयताकृती दगडी तलाव व त्याच्या काठावर चिंचेच्या बागेची निर्मिती केली.

China : चीनमध्ये लोकांचा राग होतोय अनावर; शी जिनपिंग संकटाच्या जाळ्यात

ऐतिहासिक काळापासून आजपर्यंत अनेक पिढ्या देवदर्शनासाठी जेजुरीत येतात. येथील चिंचेच्या बागेत कुलधर्म कुलाचार करतात. सध्या देवदर्शनासाठी मंदिरात भाविकांची गर्दी होत असून, देवकार्यासाठी चिंचेची बागदेखील हाउसफुल झाली आहे. या बागेत जागरण गोंधळ, जेवणावळी यांची रेलचेल दिसत आहे. जेजुरी व परिसरातील दहाहून अधिक वाघ्या-मुरुळींचे ताफे जागरण गोंधळचा विधी करीत आहेत. तसेच बागेच्या परिसरात जीवनाश्यक वस्तूंबरोबर लाकडांच्या वखारी, कोंबड्या, बकरे विक्रीसाठी आणलेले दिसून येतात. ही चिंचेची बाग दिवसेंदिवस अपुरी पडत असून कडेपठार पायथा तसेच झाडांची सावली उपलब्ध होईल तेथे थांबून भाविक देवकार्य करीत आहेत.

काबूलमध्‍ये शाळेत बॉम्बस्फोट, २५ विद्यार्थी ठार

बागेचे जतन आवश्यक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या हेतूने चिंचेची बाग निर्माण केली, त्याचे जतन होऊन भाविकांना पाणी, स्वच्छतागृह उपलब्ध होणे आवश्यक आहे. राज्यातून येणार्‍या भाविकांवर जेजुरी शहराची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे भाविकांना सोयीसुविधा देण्याकरिता पालिका, देवसंस्थान यासह विविध संस्थांनी चिंचेची बाग जतन करणे आवश्यक आहे.

Back to top button