पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे आज ( दि. १९) एका शाळेत तीन बॉम्बस्फोट झाले. यामध्ये २५ विद्यार्थी ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत, अशी माहिती अफगाण सुरक्षा आणि आरोग्य अधिकार्यांनी दिली आहे.
पश्चिम काबुलमधील एका हायस्कूलमध्ये सकाळी बाॅम्बस्फाेट झाले. आत्मघाती हल्लेखोराने शाळेमध्ये स्वत:ला उडवून दिले. यावेळी मुले शाळेबाहेर उभी होती. हायस्कूलमध्ये झालेल्या तीन स्फोटात विद्यार्थी ठार झाल्याचे काबूल कमांडरचे प्रवक्ते खालिद झदरन यांनी सांगितले.आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
अफगाणिस्तानमधून अमेरिकेने आपले सैन्य मागे घेतले. येथील सत्तेवर तालिबान्यांनी कब्जा केला. दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटसह सुन्नी दहशतवादी गट हे शिया हजारा समुदायाच्या नागरिकांना लक्ष्य करीत आहेत.ऑगस्टमध्ये सत्ता हाती घेतल्यापासून देश सुरक्षित ठेवल्याचे तालिबानचे म्हणणे आहे. परंतु आंतरराष्ट्रीय अधिकारी आणि विश्लेषकांचे म्हणणे आहे की, अफगाणिस्तान येथे पुन्हा दहशतवादी हल्ले सुरू होण्याचा धोका आहे.
हेही वाचलंत का ?