पुणे : ‘सदावर्तेंना बांगड्या भरल्यास ५ लाखांचे बक्षीस’

पुणे : ‘सदावर्तेंना बांगड्या भरल्यास ५ लाखांचे बक्षीस’

बारामती : पुढारी वृत्तसेवा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज (रविवार) बारामतीत कर्मचाऱ्यांची निषेध रॅली पार पडली. या रॅलीच्या समारोपाप्रसंगी कामगार नेत्यांनी गुणरत्न सदावर्तेंची जीभ हासडणाऱ्याला ११ लाख तर बांगड्या भरणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना पाच लाखाचे बक्षीस कामगार नेते तुकाराम चौधर यांनी जाहीर केले. कामगारांनी पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा यावेळी तीव्र शब्दात निषेध केला. शहरातून निघालेल्या रॅलीचा पेन्सिल चौकात समारोप झाला. यानंतर तालुका पोलिस ठाण्यासमोर सभा झाली.

राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या पगारवाढीविरोधात तसेच वैद्यकीय कर्मचा-यांच्या पगारवाढीला गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात याचिका दाखल करत विरोध केला होता.  जी व्यक्ती पगारवाढीला न्यायालयात जाऊन विरोध करत असेल ती कामगारांच्या हितासाठी काय न्याय मिळवून देईल, असा सवाल नानासाहेब थोरात यांनी उपस्थित केला.

तानाजी खराडे, नानासाहेब थोरात, भारत जाधव, नाना बाबर, राहुल बाबर, तुकाराम चौधर, राहुल देवकाते, गुरुदेव सरोदे, सचिन चौधर, भाऊ ठोंबरे, भारत जाधव, गजानन भुजबळ, अमोल पवार, गुरुदेव सरोदे, राहहूल बाबर, आनंद भापकर, राहूल देवकाते, प्रकाश काटे, खंडू गायकवाड, अनिल वाघ, मनीषा निंबाळकर आदींनी मनोगत व्यक्त केले.

या रॅलीनंतर पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांना निवेदन देण्यात आले. ग्रीव्ह्ज कॉटन अँड अलाईड कंपनीज एम्प्लॉएज युनियन, पियाजिओ व्हेईकल्स प्रा. लि., पुना एम्प्लॉईज युनियन, त्रिमूर्ती इ.प्रा.लि., भारतीय कामगार सेना, सुयश ॲटो. श्रायबर डायनामिक्स डेअरी , इन्सोफर, भारत फोर्ज, बाारमती दूध संघ कामगार कृती समिती आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

पोलिस यंत्रणेवरील ताण हलका… 

उपमुख्यमंत्री अजित पवार आज (रविवार) बारामतीतच होते, ते ज्या रस्त्याने जाणार होते, तो रस्ता टाळून कर्मचारी बांधवांनी रॅली काढल्याने पोलिस यंत्रणेवरील ताणही हलका झाला. कर्मचाऱ्यांच्या शिस्तबद्ध रॅलीचे दर्शन यावेळी घडले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news