पुणे : त्याने काढली चेंबरमध्ये रात्र; सतर्क पोलिसांनी वाचवले प्राण | पुढारी

पुणे : त्याने काढली चेंबरमध्ये रात्र; सतर्क पोलिसांनी वाचवले प्राण

पुणे : पुढारी वृत्तसेवा

कचरा वेचताना मध्यरात्री कसबा पेठ पंपिंग स्टेशन येथील एका चेंबरमध्ये पडलेल्या राजेंद्र नेगीचे पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे प्राण वाचले. नेगी याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘भीम मॅरेथॉन’साठी बंदोबस्तावर असलेल्या येथील फरासखाना पोलिस ठाण्याचे कर्मचारी फिरोज बागवान आणि सचिन येनपुरे या कर्मचार्‍यांना त्याचा मदतीसाठीचा आवाज आला आणि त्याची सुटका झाली.

Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल; पोलीस संरक्षण सोडलं

नेगी हा शहरात भंगार वेचण्याचे काम करतो. बुधवारी सायंकाळी नदीपात्र परिसरात तो भंगार वेचत होता. नदीपात्रानजीक एक मोठी पंपिंग टाकी असून, टाकीला झाकण नसलेले एक मोठे चेंबर आहे. येथे रात्री बारा वाजण्याच्या सुमारास तो ‘भंगार’च्या शोधात तेथे गेला. मात्र, झाकण नसलेल्या चेंबरमध्ये त्याचा पाय पडल्याने तो थेट 20 ते 25 फुट खोल चेंबरमध्ये पडला.

विक्रांत नंतर आता टॅायलेट घोटाळा बाहेर काढणार; संजय राऊत यांचा सूचक इशारा

प्रचंड अंधार आणि मोठी खोली यामुळे मनात भीती बसलेल्या नेगी याने मदतीसाठी मोठ्याने आवाज दिले. मात्र, रात्री बाराची वेळ असल्याने आवाज देऊनही त्याला मदत मिळू शकली नाही. टाकीत पाणी असल्याने सुदैवाने नेगी याला मार लागला नाही, परंतु त्याला संपूर्ण रात्र चेंबरमध्येच काढावी लागली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी माहिती मिळताच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच नेगी याला उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविले.

हेही वाचा

South Africa floods : दक्षिण आफ्रिकेच्या डरबन प्रांतात महापुराचे थैमान; तब्बल ३४० लोकांचा मृत्यू

India wheat supplier : भारतीय शेतकरी जगाची भूक भागवणार! आता इजिप्तला करणार गहू पुरवठा

Ranbir Kapoor-Alia Bhatt : नवविवाहीत रणबीर-आलियाचा पहिला रोमँटिक फोटो आला समोर!

Back to top button