दहावी गुणपत्रिका ९ ऑगस्टला मिळणार, गर्दी टाळण्याची सूचना | पुढारी

दहावी गुणपत्रिका ९ ऑगस्टला मिळणार, गर्दी टाळण्याची सूचना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दहावी गुणपत्रिका : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावीच्या गुणपत्रिका 9 ऑगस्टपासून देण्यात येणार आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठराविक दिवशीच गुणपत्रिका नेण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर करू नये, अशी सूचना राज्य मंडळाने शाळांना दिली आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रत्येक वितरण केंद्राला जोडलेल्या शाळांची संख्या लक्षात घेऊन जास्त वितरण केंद्रे निर्माण करणे किंवा त्याच वितरण केंद्रावर सुरक्षित अंतर ठेवून वितरण खिडक्यांची संख्या वाढवून दहावी गुणपत्रिका वितरित कराव्यात. विभागीय मंडळाकडून शाळांना 7 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला गुणपत्रिका वितरित करण्यासाठी दिल्या जातील.

शाळांनी 9 ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार शासनाच्या नियमांचे पालन करून गुणपत्रिक विद्यार्थ्यांना द्याव्यात. विद्यार्थ्यांनी ठरावीक दिवशीच शाळेत येऊन गुणपत्रिका घेण्याची सक्ती करण्यात येऊ नये, शाळांमध्ये पालक-विद्यार्थ्यांची एकाच वेळी गर्दी न होण्याबाबत नियोजन करावे. तसेच गुणपत्रिका वितरणासाठी केंद्रावर स्थायी लिपीक व शिपाई पाठविण्याबाबत कार्यवाही करावी असे आदेश राज्य मंडळाचे सचिव डॉ. भोसले यांनी विभागीय मंडळाच्या सचिवांना दिले आहेत.

हे ही वाचलं का?

Back to top button