पुणे : बाप-लेकाची भेट घडू न देणार्‍या आईला न्यायालयाचा दणका | पुढारी

पुणे : बाप-लेकाची भेट घडू न देणार्‍या आईला न्यायालयाचा दणका

पुणे : पुढारी वृत्तसेवा

आईने जर वडिलांना मुलाला भेटण्यास मज्जाव केला तर चुकलेल्या प्रत्येक भेटीसाठी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल, असा आदेश कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश निरंजन नाईकवाडे यांनी दिला आहे. कौटुंबिक कलहामुळे विभक्त राहणार्‍या पतीला मुलाला भेटू न देणार्‍या पत्नीला हा आदेश देण्यात आला आहे.

शरद पवार म्हणतात, काश्मीर फाईल्सच्या प्रदर्शनास परवानगीच मिळायला नको होती

रोहन आणि रोहिणी (दोघांची नावे बदलेली आहेत) यांचा विवाह मे 2007 साली झाला. तो अभियंता असून, एका खाजगी कंपनीत कामाला आहे, तर तिचेदेखील अभियांत्रिकी शिक्षण झाले असून, ती गृहिणी आहे. काही महिने संसार सुखाचा झाल्यानंतर मतभेदांमुळे त्यांच्यात सतत वाद होऊ लागले. त्यामुळे तो विभक्त राहू लागला. त्याने 2021 मध्ये अ‍ॅड. तौसिफ शेख यांच्या मार्फत घटस्फोटाचा दावा दाखल केला.

कोल्हापूर : बायकोला अमानुष मारहाण करून भररस्त्यावर विवस्त्र करण्याचा प्रयत्न

घटस्फोटाचा दावा दाखल करताना मुलाचा ताबा मिळावा, यासाठीदेखील त्याने अर्ज दाखल केला होता. त्यावेळी त्याची पत्नी हेतुपुरस्सर मुलाला भेटू देत नसल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली. न्यायालयाने पतीला मुलाला भेटण्याची परवानगी दिली. तसेच जर पत्नीने मुलाला भेटू दिले नाही, तर चुकलेल्या प्रत्येक भेटीसाठी तिला 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. तसेच पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत मुलाला भेटू दिले नाही, अथवा तिने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले तर मुलाचा ताबा वडिलांकडे सोपविण्यात येईल, असेही न्यायालयाच्या आदेशात नमूद केले आहे.

हेही वाचा

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प : क्षेत्र संचालकांनी चक्क पुण्याहून सायकलनं कोल्हापूरला येत स्वीकारला पदभार

Nashik : चांदवडच्या रंगमहालाला मिळणार गतवैभव

सोयाबीन तेलाच्या किमतीत वर्षभरात ४२.२२ टक्क्यांनी वाढ

Back to top button