

आळंदी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्याचा उत्साह ओसंडून वाहत असताना शनिवारी (दि. ११) सायंकाळच्या सुमारास चोरीच्या संशयावरून पोलिसांनी मंदिर परिसरात चार ते पाच जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर शहरातुन विविध भागात असलेले जवळपास १५०च्या आसपास पारधी समाजाचे लोक ताब्यात घेत पोलिसांनी रात्रभर पोलीस स्टेशनला ठेवले आहेत.
पारधी लोकांनी तिथेच उपोषण सुरू केल्याचे पारधी समाजातील दिगंबर काळे यांना समजताच त्यांनी समाजाच्या कार्यकर्त्या सुनीता भोसले यांना सांगितले. त्यांनी सांगितले की रात्रीपासून पारधी लोक पोलिसांनी नजर कैदेत ठेवले आहेत. यात महिला, लहान मुले व पुरुष असा समावेश आहे. त्यातील अनेक लोक भीक मागणारे तर काही फुगे विकून उदरनिर्वाह करणारे आहेत. त्यांना तात्काळ सोडून द्यावे अशी आमची मागणी असणार आहे. दुपारपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनला जाणार आहोत. दरम्यान याबाबत आळंदी पोलिसांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
हेही वाचा