

आश्वी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : गेली अनेक वर्षे चातक पक्षाप्रमाणे पाण्याची वाट पाहणार्यांसाठी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याला पाणी सोडले. दरम्यान, उजव्या कालव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 2 महिन्यांमध्ये धरणासह उजव्या कालव्याचे उद्घाटन होऊन लाभधारक शेतकर्यांना पाणी देणार, असा ठाम विश्वास महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी व्यक्त केला. उजवा कालवा कृती समितीच्या पदाधिकार्यांनी दिलेल्या निवेदनाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी निळवंडे धरण उजवा कालवा कृती समितीचे अध्यक्ष भारत गिते पा., अॅड. पोपटराव वाणी व लाभधारक शेतकर्यांनी मंत्री विखे पा. यांची भेट घेऊन उजवा कालव्याच्या लाभधारक शेतकर्यांना लवकर पाणी मिळावे, अशी मागणी केली. यावर मंत्री विखे पा. म्हणाले, स्व. पद्मभुषण खा. बाळासाहेब विखे पा. यांचे स्वप्न होते की, जिरायत भागातला शेतकरी सुखी व्हावा. त्याला हक्काचे पाणी मिळावे. मी काँग्रेस सरकारमध्ये मंत्री असताना सातत्याने निळवंडे धरणासाठी निधीसाठी प्रयत्न केला.
श्रीसाईबाबा संस्थान व केंद्राचा निधी मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी मदत झाली. म्हणून आज हा सोन्याचा दिवस पहायला मिळाला असे सांगत, डावा कालवा पुर्ण झाला. त्याला पाणी सोडण्यासह शेवटपर्यंत पाणी देण्याचा संकल्प पुर्ण झाला.2 महिन्यांत उजव्या कालव्याचे कामे पूर्ण करून लाभार्थी शेतकर्यांना पाणी देण्यास मी बांधील आहे, असे अभिवचन मंत्री विखे यांनी दिले.
हे ही वाचा :