पुणे : बिटकॉईन देण्याच्या बहाण्याने 19 लाखाची फसवणूक | पुढारी

पुणे : बिटकॉईन देण्याच्या बहाण्याने 19 लाखाची फसवणूक

पुणे : पुढारी वृत्तसेवा

बिटकॉइन देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची पाच जणांनी मिळून 19 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवार पेठ येथे राहणार्‍या एका 36 वर्षीय व्यक्तीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून रंजित जनरल सिंह (वय 37, रा. मिराभाईंदर), शब्बीर शेख (वय 41, रा. मिरा रोड), सुजॉय पॉल (रा. हांडेवाडी), मंगेश कदम (रा. गोखलेनगर) आणि मुकूल (रा. मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Petrol Diesel Prices : १० दिवसांत नवव्यांदा इंधन दरात वाढ, मुंबईत डिझेलचे शतक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि काही आरोपींची 19 मार्च 2020 रोजी नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील ‘प्रोजेक्टर रिअ‍ॅलिटी’ या ऑफिसमध्ये भेट झाली होती. आरोपींनी फिर्यादींचा विश्वास संपादन करून, त्यांना दीड बिटकॉइन देण्याचे आमिष दाखविले होते. त्यासाठी आरोपींनी फिर्यादींना 19 लाख 70 हजार 886 रुपये आरोपी सिंह याच्या खात्यात ‘ट्रान्स्फर’ करण्यास सांगितले होते. फिर्यादीने विश्वास ठेवून सांगितलेले पैसे पाठवले होते. मात्र, ठरल्याप्रमाणे आरोपींनी फिर्यादींना बिटकॉइन दिला नाही. तसेच, पैसेही परत केले नाही. पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत.

हेही वाचा

मोठी बातमी! PAN-Aadhaar Link करण्यासाठी ‘एवढा’ बसणार भुर्दंड

रशिया- युक्रेन युद्ध : कुटनितीमुळे भारताचा वाढला जगात दबदबा; अनेक देशांचे परराष्ट्रमंत्री भारत दौर्‍यावर

नाशिकरोड करन्सी नोट प्रेस च्या आवारात भीषण आग

Back to top button