पुणे : धक्कदायक... व्हिडिओ व्हारयल करण्याच्या धमकीने महिलेचे शोषण | पुढारी

पुणे : धक्कदायक... व्हिडिओ व्हारयल करण्याच्या धमकीने महिलेचे शोषण

पुणे : पुढारी वृत्तसेवा

खासगी क्षणातील व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमकीने प्रियकराने मित्रासोबत मिळून एका महिलेचे शारिरीक व आर्थिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधीत महिलेला तिचे रो हाऊस विकण्यास भाग पाडून त्यातून आलेले पैसे देखील हडप केले आहेत.

नाशिकरोड करन्सी नोट प्रेस च्या आवारात भीषण आग

याप्रकरणी येरवडा परिसरात राहणार्‍या एका 40 वर्षाच्या महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पुरुषोत्तम लाल बुटानी (रा. खेसे पार्क, लोहगाव), वासुदेव पाटील (रा. खेसेपार्क, लोहगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 2012 पासून सुरु होता.

पुढील ईडीची धाड माझ्यावर असेल, स्वागतासाठी तयार : नाना पटोले

आरोपी बांधकाम व्यावसायिक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पुरुषोत्तम बुटानी हा बांधकाम व्यवसायिक आहेत. फिर्यादी यांच्या वडिलांच्या तो ओळखीचा आहे. त्याचे व फिर्यादी यांचे 2012 पासून प्रेमसंबंध होते. त्यांचे एकमेकांच्या घरी जाणे येणे होते. बुटानी याने फिर्यादी यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन त्यांना लोहगाव, बाणेर, वाघोली येथील वेगवेगळ्या लॉजवर घेऊन जाऊन त्यांच्याबरोबर शरीरसंबंध निर्माण केले. वासुदेव पाटील याने या दोघांच्या शरीर संबंधाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

केजरीवाल यांच्या घरावरील हल्लाप्रकरणी आठजणांना अटक

दोघांनी फिर्यादी यांना त्यांच्या नावावर असलेला रो हाऊस विकण्यास सांगितले. त्या बदल्यात त्यांना एक दुकान व फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले. मात्र, याला त्यांनी विरोध दर्शविल्यावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन रो हाऊसच्या कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घेतल्या. त्यानंतर त्यांनी परस्पर रो हाऊस विकला. त्यांचे काहीही पैसे फिर्यादीला दिले नाही. दुकान, फ्लॅटही न दिल्याने त्यांना आता भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. फिर्यादी यांचे शारीरीक, मानसिक, आर्थिक शोषण केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जोगन तपास करीत आहेत.

Back to top button