पुणे : वारजेत दुचाकी-टेम्पो अपघातात तरुण ठार | पुढारी

पुणे : वारजेत दुचाकी-टेम्पो अपघातात तरुण ठार

वारजे ;  पुढारी वृत्तसेवा : वारजे एन.डी. ए मुख्य रस्त्यावर दुचाकी आणि टेम्पो अपघातात तरुण ठार झाला. साहील रेवनाथ वाळूंज (वय २० जि. पुणे रा. साई रेसिडेन्सी, देशमुखवाडी शिवणे) असे त्‍याचे नाव आहे. वारजे गणपती माथा येथे मैदानाजवळील मुख्य रस्त्यावर आज सकाळी ही दुर्घटना घडली.

शिवणे एन.डी.ए मुख्य रस्त्यावरून साहील वाळूंज हा  (एम. एच २९ वाय १४४८)  दुचाकीवरून नर्हे येथे कॉलेजला निघाला होता. गणपती माथा येथे मोकळ्या मैदानानजीक समोरून येणाऱ्या (एम.एच ०२इ सी १५०६) मालवाहतूक करणार्‍या टेम्पोला त्‍याची समोरून जोरदार धडक बसली.

या अपघातात साहीलला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी  खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तत्पूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 साहील वाळूंज हा पुणे येथील झील कॉलेज येथे डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. साहीलच्या अपघाताची माहिती मिळताच त्याच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी अपघात ठिकाणी धाव घेतली. त्याच्या मृत्यूने वारजे शिवणे परिसरात हळहळत व्यक्त हाेत आहे. तपास वारजे पोलीस करत आहेत.

हेही वाचा:

Back to top button