Petrol Diesel prices hike : आठवड्यात सलग तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल दरवाढ | पुढारी

Petrol Diesel prices hike : आठवड्यात सलग तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल दरवाढ

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : Petrol Diesel prices hike : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रत्येकी ८० पैशांची वाढ केली. मागील चार दिवसांच्या कालावधीत झालेली ही तिसरी इंधन दरवाढ आहे. ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे प्रती लीटरचे दर ९७. ८१ रुपयांवर तर डिझेलचे दर ८९. ०७ रुपयांवर पोहोचले आहेत.

साडेचार महिने इंधनाचे दर स्थिर ठेवल्यानंतर गेल्या मंगळवारी सर्वप्रथम तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेल दरात वाढ केली होती. रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यान सुरू असलेल्या युध्दामुळे जागतिक बाजारात गेल्या काही काळात क्रूड तेलाचे दर कडाडले आहेत. याच्या परिणामी इंधन दरवाढ करावी लागत असल्याचे तेल कंपन्यांचे म्हणणे आहे. येत्या काही काळात इंधन दरवाढ कायम राहण्याचे संकेतही तेल कंपन्यांनी दिले आहेत.

मुंबईत पेट्रोलचे दर ११२. ५१ रुपयांवर तर डिझेलचे दर ९६. ७० रुपयांवर गेले आहेत. कोलकाता येथे हे हेच दर क्रमशः १०७. १८ आणि ९२.२२ रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे चेन्नई येथे हे दर क्रमशः १०३. ६७ आणि ९३. ७१ रुपयांवर पोहोचले आहेत. (Petrol Diesel prices hike)

हेही वाचलंत का? 

Back to top button