पुणे शहरात पाच वर्षांत 14 वाहतूक प्रकल्प पूर्ण

पुणे शहरात पाच वर्षांत 14 वाहतूक प्रकल्प पूर्ण
Published on
Updated on

हिरा सरवदे

पुणे : शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी महापालिकेच्या प्रकल्प विभागाने मागील पाच वर्षांत 14 प्रकल्प पूर्णत्वास नेले असून, यात उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचा समावेश आहे. मात्र, पुरेशा निधीअभावी प्रकल्प रखडले, असे कारण सांगणार्‍या प्रशासनाने महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये प्रकल्पांसाठी पाच वर्षांत केलेल्या तरतुदीच्या पन्नास टक्केच रक्कम खर्च केल्याचे समोर आले आहे.

नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी महापालिकेच्या वतीने अनेक लहान-मोठे प्रकल्प शहरात राबविले जातात. यासाठी महापालिकेमध्ये स्वतंत्र प्रकल्प विभाग कार्यरत आहे. या विभागाला दरवर्षी अंदाजपत्रकामध्ये स्वतंत्र निधी दिला जातो. हा निधी त्या-त्या आर्थिक वर्षात पूर्ण खर्च होणे अपेक्षित आहे. एखाद्या प्रकल्पाला निधी कमी पडत असेल आणि तो प्रकल्प शहरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल तर महापालिका आयुक्त किंवा स्थायी समिती वर्गीकरणाद्वारे निधी उपलब्ध करून देते.

प्रकल्प विभागाकडून इतर प्रकल्पांच्या तुलनेत शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी विविध प्रकल्प राबविण्यावर भर दिला जातो. यामध्ये वाहतूक कोंडी होणार्‍या ठिकाणी उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, भुयारी मार्ग असे प्रकल्प उभारले जातात. महापालिकेच्या प्रकल्प विभागाने महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर 2017 पासून मार्च 2022 पर्यंत पाच वर्षात 14 प्रकल्प पूर्ण केले आहेत. यामध्ये बहुसंख्य उड्डाणपुलांचा समावेश आहे. सन 2017 मध्ये दोन उड्डाणपूल व एक भुयारी मार्ग, 2018 मध्ये 4 उड्डाणपूल, 2019 मध्ये नदीवर दोन पूल, एक उड्डाणपूल, 2020 मध्ये एक भुयारी मार्ग, 2021 एक उड्डाणपूल आणि रेल्वे मार्गाखाली दोन भुयारी मार्ग आणि 2022 मध्ये नळस्टॉप चौकातील मेट्रोच्या साहाय्याने एक उड्डाणपूल असे प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. सध्या शहरात 3 उड्डाणपूल व एका राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे काम सुरू आहे. भविष्यात प्रकल्प विभागाकडून नदीकाठ सुशोभीकर प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

मागील पाच वर्षांतील तरतूद व खर्च (कोटीमध्ये)

वर्ष तरतूद झालेला खर्च

  • 2017-18             278.57           177.71
  • 2018-19             188.65            118.21
  • 2019-20              236.65           142.45
  • 2020-21             182.08            85.10
  • 2021-22              377.31           156.28
  • एकूण                  1263.26         679.75

पाच वर्षांत पूर्ण झालेले प्रकल्प, खर्च आणि वर्ष

1) स्वारगेट चौकातील उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग (126.99 कोटी) – मे 2017
2) अभियांत्रिकी महाविद्यालय चौक उड्डाणपूल (23.04 कोटी) – नोव्हेंबर 2017
3) कमिन्स कॉलेज जंक्शन, वारजे रस्ता उड्डाणपूल (23.92 कोटी) – जानेवारी 2018
4) छत्रपती शाहू महाराज सेतू, शिवाजीनगर (19.99 कोटी) – जून 2018
5) पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर मुंढवा येथे उड्डाणपूल (25.95 कोटी) – ऑगस्ट 2018
6) अलंकार थिएटरजवळ रेल्वे उड्डाणपूल (12.19 कोटी) – डिसेंबर 2018
7) मुंढवा येथे मुळा-मुठा नदीवर पूल (16.98 कोटी) – फेब—ुवारी 2019
8) दापोडी येथे हॅरिस पुलाशेजारी नदीवर पूल (24.35 कोटी) – मे 2019
9) लुल्लानगर चौकातील उड्डाणपूल (14.86 कोटी) – जून 2019
10) न्यू कमांड हॉस्पिटल येथे भुयारी मार्ग (4.60 कोटी) – जानेवारी 2020
11) सेव्हन लव्हज चौक ते वखार महामंडळ चौक उड्डाणपूल (23.52 कोटी) जून 2021
12) सय्यदनगर आणि काळेपडळ येथे रेल्वे गेटजवळ भुयारी मार्ग (8.58 कोटी) – 2021
13) औंध व सांगवीला जोडणारा मुळा नदीवर पूल (23.74 कोटी) काम पूर्ण
14) नळ स्टॉप चौकातील मेट्रो व उड्डाणपूल (58.45 कोटी) – मार्च 2022

कामे सुरू असलेले प्रकल्प

  • घोरपडी येथील रल्वे मार्गावरील उड्डाणपूल
  • येरवडा येथील गोल्फ चौकातील उड्डाणपूल
  • पाषाण सूस येथे राष्ट्रीय महामार्गावरील पूल
  • सिंहगड रस्त्यावरील

https://youtu.be/wimwsVNgHnY

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news