पुण्यात भित्तीचित्रांतून नदी पुनरुज्जीवनाचा संदेश | पुढारी

पुण्यात भित्तीचित्रांतून नदी पुनरुज्जीवनाचा संदेश

पुणे : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आल्यानंतर पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी जेव्हा शाळेत प्रवेश केला, तेव्हा दर्शनी भागावर त्यांना राम नदी पुनरुज्जीवनाचा संदेश पाहायला मिळाला. ‘किर्लोस्कर न्यूमॅटिक्स’च्या वतीने व पुणे मनपा शिक्षण मंडळाच्या सहकार्याने गतवर्षीपासून राम नदीच्या काठावरील 25 शाळांतील सुमारे साठ हजार विद्यार्थांमध्ये राम नदीविषयीच्या जागृतीचा कार्यक्रम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून या वर्षी औंध, बाणेर, बावधन, पाषाणमधील 14 शाळांतील सुमारे 38 भिंती रंगविण्यात आल्या आहेत, अशी माहिती अभियानाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी दिली.

कालच्या विजयानंतर आज मोदींचा थेट गुजरातमध्ये जाऊन रोड शो !

या प्रकल्पाबद्दल किर्लोस्करचे डॉ. सुरेश मिजार म्हणाले, ’स्व. शंतनुराव किर्लोस्कर यांच्या प्रेरणेतून गेली अनेक वर्षे आम्ही स्वच्छ शाळा, सुंदर शाळा हा उपक्रम राबवित आहोत. शालेय मुलांना राम नदी, तिचे आरोग्य व नदी रक्षणाचे महत्त्व कळावे यासाठी आम्ही अनेक उपक्रमांचे आयोजन सातत्याने करणार आहोत.’

प्रशांत किशोर म्हणतात, साहेबांच्या चालीत फसू नका, खरी लढाई २०२४ साली

तीनशे शिक्षकांना प्रशिक्षण

‘भित्तीचित्रांच्या निम्म्या भागात प्रदूषण, अतिक्रमण, सांडपाणी, प्लास्टिक कचरा इ. समस्यांनी वेढलेली राम नदी दाखविण्यात आली आहे, तर उर्वरित निम्म्या भागात, स्वच्छता करणारी, झाडे लावणारी, जलचरांना सांभाळणारी अशी शाळेतील मुले दाखविण्यात आली आहेत. दुर्लक्षित राम नदी प्रदूषणमुक्त झाली पाहिजे, यासाठी 25 शाळांमधील सुमारे 300 शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. 38 प्रभावी चित्रांचे रेखाटन ‘क्राफ्ट शिफ्ट इव्हेंट्स’चे दीपक शिंदे व त्यांच्या 8 कलाकारांनी केले आहे.

हेही वाचा

नवाब मलिक यांच्या याचिकेवरील निर्णय हायकोर्टाने राखून ठेवला

भाजपच्या विजयात मायावती, ओवेसींचे योगदान; त्यांना भारतरत्न द्या : संजय राऊत

Driving Licence : ड्रायव्हिंग लायसन्स नसले तरीही वाहतूक पोलिस कापू शकणार नाहीत चलन

Back to top button