भाजपच्या विजयात मायावती, ओवेसींचे योगदान; त्यांना भारतरत्न द्या : संजय राऊत | पुढारी

भाजपच्या विजयात मायावती, ओवेसींचे योगदान; त्यांना भारतरत्न द्या : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाब वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय संपादन केला आहे. देशभरात भाजप कार्यकर्त्यांकडून या विजयाचा जल्लोष सुरू आहे. तर शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) यांनी भाजपच्या या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या म्हटले आहे की, भाजपने मोठा विजय मिळवला आहे. यूपी त्यांचेच राज्य होते, तरीही अखिलेश यादव यांच्या जागा ४२ वरून १२५ वर जाऊन ३ पट वाढलेल्या आहेत. मायावती आणि ओवेसी यांनी भाजपच्या विजयात योगदान दिले आहे, त्यामुळे त्यांना पद्मविभूषण, भारतरत्न देण्यात यावा, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश, गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आपले उमेदवार उभे केले होते. परंतु, त्यांना खातेही खोलता आले नाही. तर काही उमेदवारांना आपले डिपॉझिटही वाचवता आलेले नाही. यावरून भाजपकडून शिवसेनेवर जोरदार टीका होऊ लागली आहे. आता राऊत यांनी भाजपच्या विजयावर प्रतिक्रिया देताना निशाणा साधला आहे.

पंजाबमध्ये पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री, सर्वांनी जबरदस्त प्रचार केला, मग पंजाबमध्ये तुमचा पराभव का झाला? यूपी, उत्तराखंड, गोवा आधीच तुमचे होते, ते ठीक आहे. पण, यूपीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेच्या तुलनेत पंजाबमध्ये तुमचा जास्त पराभव झाला आहे, भाजपने ४ राज्यात विजय मिळवला आहे, आम्हाला नाराज होण्यासारखे काही नाही, आम्ही तुमच्या आनंदात सहभागी आहोत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री का हरले? गोव्यात २ उपमुख्यमंत्री हरले. पंजाबचा सर्वाधिक प्रश्न आहे, भाजपसारख्या राष्ट्रवादी पक्षाला पंजाबमध्ये पूर्णपणे नाकारण्यात आले आहे,  असेही  राऊत यांनी म्हटले आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : पुन्हा भाजपाची सत्ता – काय म्हणतायत केशव उपाध्ये ? | Keshav upadhye on UP’s Election

Back to top button