पिंपरी : महापालिका प्रभागरचनेला ग्रहण! | पुढारी

पिंपरी : महापालिका प्रभागरचनेला ग्रहण!

पिंपरी : मिलिंद कांबळे : प्रथम एक, नंतर चार पुन्हा तीन आणि 11 नगरसेवक वाढल्याने पुन्हा प्रभागरचनेची फोडाफोडी अशा चक्रव्युहातून बाहेर पडून अखेर राज्य निवडणूक आयोगाच्या दरबारी अंतिम सुनावणीचा अहवाल पोहचल्यानंतर पुन्हा एकदा प्रभागरचनेला ग्रहण लागले आहे.

सुनावणीनंतर प्रभागरचनेचा अंतिम आदेश होण्याची प्रतीक्षा सुरू असतानाच राज्य विधिमंडळाच्या निर्णयामुळे प्रभागरचनेला पुन्हा खो बसला आहे. त्यामुळे निवडणुका लांबणीवर पडू शकतात. परिणामी, महापालिका प्रशासनासह आजी-माजी नगरसेवक व इच्छुकांना पुन्हा नव्याने तयारी करावी लागणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने 25 ऑगस्ट 2021 ला एक सदस्य वॉर्डानुसार प्रभागरचना करण्याचे आदेश महापालिकेस दिले. त्यासाठी 25 अधिकार्‍यांची स्वतंत्र समिती स्थापन करून आयुक्त राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रभागरचनेचे कामकाज सप्टेंबरला संथ गतीने सुरू केले.

तेव्हा राज्यपालांनी लोकशाहीचा गळा घोटला नाही का ? गिरीश महाजनांना न्यायालयाचा तगडा झटका

दरम्यान, राज्य शासनाने एकऐवजी त्रिसदस्यीय पद्धतीने महापालिका निवडणुका घेण्याचा निर्णय 22 सप्टेंबरला घेतला. त्या निर्णयावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केल्यानंतर तसे राज्य निवडणूक आयोगास कळविण्यात आले.

त्यानुसार आयोगाने 5 ऑक्टोबरला महापालिकेस त्रिसदस्यीय प्रभागरचनेनुसार प्रारूप आराखडा बनविण्याचे आदेश दिले. पालिकेने काम सुरू करून अंतिम टप्प्यात कामकाज आणले होते.

सन 2011 नंतर मोठ्या प्रमाणात वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन महापालिकेचे 11 नगरसेवक वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने 27 ऑक्टोबर 2021 ला घेतला. त्यामुळे महापालिकेचे 128 चे 139 नगरसेवक झाले.

Barbie Doll : … अन् जगासमोर आली बार्बी

तर, 32 वरून एकूण 46 प्रभाग झाले. प्रारूप आराखडा तयार करून 30 नोव्हेंबरपर्यंत पाठविण्याचे आदेश आयोगाने महापालिकेस 3 नोव्हेंबर 2021 ला दिले.

त्यानुसार पालिकेने प्रारूप आराखडा आयोगास 6 डिसेंबरला पाठविला. वेगवेगळ्या त्रृटी दूर करून प्रारूप आराखडा 15 जानेवारी 2022 ला आयोगास सादर करण्यात आला.

प्रारूप प्रभाग 1 फेब्रुवारीला प्रसिद्ध करून त्यावर 14 फेबु्रवारीपर्यंत सूचना व हरकती स्वीकारण्यात आल्या. विक्रमी संख्येने तब्बल 5 हजार 684 हरकती दाखल झाल्या. त्यावर 25 फेबु्रवारीला सुनावणी झाली. सुनावणीचा अहवाल 2 मार्चला आयोगास पाठविण्यात आला.

यवतमाळ : गॅस सिलिंडरच्या स्फोटात गर्भवती महिलेसह आठ वर्षाच्या मुलीचा होरपळून मृत्यू

प्रभागरचना व मतदार यादीचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत आता प्रभागरचना बदलल्यास पुन्हा नव्याने तयारी करावी लागणार आहे. इच्छुकांचा पुन्हा खर्च करावा लागणार असल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे.

नव्याने प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर तसेच, एससी आणि एसटीचे आरक्षण स्पष्ट झाल्याने अनेकांनी आपल्या सोईस्कर प्रभागात धडाक्यात काम सुरू केले होते. लाखो रुपये खर्च करून सर्वेक्षण करून घेतले होते.

मेळावे, बैठक, सांस्कृतिक व मनोरंजन कार्यक्रम, सहली, देवदर्शन, महिलांचे कार्यक्रम, भेटीगाठीचा धडाका लावत मोठ्या प्रमाणात फ्लेक्सबाजी सुरू केली होती. तसेच, सोशल मीडियावर प्रसिद्धीचा जोर वाढविला होता.निवडणुका लांबणीवर पडल्यास आणि प्रभागरचना बदलल्यास तो खर्च पाण्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अभिनेत्रीला जुई गडकरीला झालाय हा आजार, पण ताकदीने…

महापालिका अधिकारी, कर्मचार्‍यांची मेहनत निष्फळ?

महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी प्रभागरचना करण्यासाठी बरीच मेहनत घेतली. पालिकेचे नियमित कामकाज बाजूला ठेवून निवडणुकीच्या कामास प्राधान्य दिले.

प्रभाग रचनेसाठी आयुक्त राजेश पाटील यांनी 25 अधिकार्‍यांची स्वतंत्र समिती स्थापन केली होती. त्यांनी गुगल मॅपचा आधार घेत प्रभागरचनेचे नकाशे तयार केले.

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल

मुदतीमध्ये काम पूर्ण केले. काही अधिकारी व कर्मचार्‍यांनी त्या काळात साप्ताहिक सुटीही घेतली नाही. पालिका भवनासह सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयात प्रभागरचनेचे आराखड्याचे नकाशे चौदा दिवस लावण्यात आले.

प्रभागरचनेवर विक्रमी संख्येने आलेल्या सूचना व हरकतींवर सुनावणी झाली. तसेच, प्रभागनिहाय मतदार यादीचे काम करण्यात आले. आता पुन्हा नव्याने प्रभागरचना करावी लागणार असल्याने पालिका अधिकारी व कर्मचार्‍यांनी केलेली मेहनत पाण्यात गेली आहे. मात्र, अधिकारी व कर्मचार्‍यांना वरील त्या कामाचा अनुभव मिळाला आहे.

क्रिकेटच्‍या नियमांमध्‍ये मोठे बदल, आता ‘मंकडिंग’ म्‍हणजे…

प्रभागनिहाय यादीचे कामही पूर्ण

प्रभाग आराखड्यासोबत प्रभागनिहाय मतदार याद्या बनविण्याचा आयोगाचा आदेश 3 फेब्रुवारी 2022 ला महापालिकेस मिळाला. त्यानुसार पालिका प्रशासनाने कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देऊन यादी फोडण्याचे काम 28 फेब्रुवारीला पूर्ण केले.

जत तालुका हादरला, टोळी युद्धात दोन तरुणांचा खून, एक गंभीर

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रतीक्षा

विधिमंडळाच्या निर्णयामुळे प्रभागरचना तयार करण्याचे अधिकार राज्य सरकारला मिळाले आहेत. त्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची स्वाक्षरी झाल्यानंतर तसे राज्य निवडणूक आयोगास कळविले जाईल.

राज्य शासनाने त्रिसदस्यीय प्रभागरचना बदलण्याचा निर्णय घेतल्यास आयोगाकडून तसे महापालिकेस कळविले जाईल. त्यानुसार नव्या सदस्य पद्धतीनुसार प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा तयार केला जाईल, असे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. या प्रक्रियेस एक ते दोन आठवडे लागण्याची शक्यता आहे.

राज्यपालांच्या कारभारावर मुंबई हायकोर्टने व्यक्त केली नाराजी

प्रभागरचनेचा विषय अंधातरी

प्रभागरचना सोईस्कर व्हावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर अनेक जणांची अवस्था ‘सळो की पळो’ अशी झाली होती.

हरकत घेतल्यानंतर प्रभाग मनाजोगा होईल, असे वाटत असतानाच प्रभागरचना रद्द झाल्याच्या चर्चेमुळे काहींना दिलासा मिळाला आहे. तर, काहींचा भ्रमनिरास झाला आहे.

निवडणूक कधी लागणार यांची उत्सुकता असताना पुन्हा श्रीगणेशा करावा लागणार आहे. आणखी 4 ते 6 महिन्यानंतर निवडणुका लांबणीवर पडल्याच्या शक्यतेमुळे पूर्वतयारी केलेल्याची गोची झाली आहे.

Back to top button