पुणे : रिंगरोडसाठी पाच गावांतील अधिगृहित होणाऱ्या जमिनीचा दर निश्चित | पुढारी

पुणे : रिंगरोडसाठी पाच गावांतील अधिगृहित होणाऱ्या जमिनीचा दर निश्चित

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शहराची वाहतूक कोंडीतून मुक्तता होण्याबरोबरच जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणार्‍या रिंगरोडसाठी अखेर मावळ तालुक्यातील पाच गावांतील अधिगृहित होणाऱ्या जमिनीचा दर निश्चित झाला आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार (दि.3) रोजी पहिली बैठक पार पडली.

पुढील पंधरा दिवसांत रिंगरोडसाठी पहिले खरेदीखतदेखील होण्याची शक्यता व्यक्त केली. स्वेच्छेने जमिनी देणार्‍या शेतकर्‍यांना रेडिरेकनरच्या तब्बल पाचपट मोबदला दिला जाणार आहे.

Nuclear Power Plant : रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील न्युक्लियर पावर प्लांटला आग, रेडिएशन लीक होण्याची भिती

दोन टप्प्यात होणार काम

पूर्व आणि पश्चिम असा दोन टप्प्यात हा रिंगरोड करण्यात येणार आहे. यासाठी पश्चिम भागातील रिंगरोडसाठी जमीन मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. मोजणी पूर्ण झाल्यानंतर दर निश्चिती केली जाते. दर निश्चिती करताना जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रचंड खबरदारी घेण्यात आली असून, सर्व तांत्रिक गोष्टी बारकाईने तपासणी करून घेण्यात आली.

रशियन मेजर जनरल युक्रेनमध्ये लष्करी संघर्षात ठार; सैन्याचे मोठे नुकसान

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित सर्व अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मावळ तालुक्यातील पाचणे, बेंबडओहोळे, धामणे, परंदवाडी, उर्से या पाच गावांचे दर निश्चित झाले आहेत. आता पुढील प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच खरेदीखत करण्यास सुरुवातदेखील होईल.

असा होणार रिंगरोड

भोर : केळवडे, कांजळे, खोपी, कुसगाव आणि रांजे
हवेली : रहाटावडे, कल्याण, घेरासिंहगड, खासगाव मावळ, वरदाडे, मालखेड, सांडवी बुद्रुक, सांगरूण, बहुली.
मुळशी : कातवडी, मारणेवाडी, आंबेगाव, उरावडे, आंबोली, भरे, आंबडवेट, घोटावडे, रिहे, केससेवाडी, पिंपलोळी.
मावळ : पाचणे, बेंबडओहोळे, धामणे, परंदवाडी, उर्से.

शेअर बाजारावर युद्धाचं सावट कायम! सेन्सेक्स १,१०० अंकांनी घसरला

जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी भूसंपादनाच्या केलेल्या नियोजनामुळे रिंगरोडचा प्रश्न मार्गी लागला आहे. मावळ तालुक्यातील पाच गावांचे दर निश्चित झाले आहेत. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यासाठी तीन दिवसांची समृद्धी महामार्गासाठी काम केलेल्या काही प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांनी पुण्यात येऊन कार्यशाळा घेतली.
– संदेश शिर्के, प्रांत अधिकारी, मावळ

बिहार : भागलपूरमध्ये भीषण स्फोट, ७ जण ठार, ११ जखमी, ३ मजली इमारत जमीनदोस्त

Back to top button