रशियन मेजर जनरल युक्रेनमध्ये लष्करी संघर्षात ठार; सैन्याचे मोठे नुकसान | पुढारी

रशियन मेजर जनरल युक्रेनमध्ये लष्करी संघर्षात ठार; सैन्याचे मोठे नुकसान

पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेन आणि रशियाच्या युद्धात दोन्ही देशांचं अमाप नुकसान झाले आहे. रशियाला आर्थिक पातळीवर जबरदस्त फटका सहन करावा लागत आहे, तर युक्रेन पूर्णच उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे. अशा परिस्थितीत रशियाला आणखी एक धक्का बसला आहे. तो म्हणजे युक्रेनमध्ये नेतृत्व करण्यासाठी गेलेल्या मेजर जनरलचा मृत्यू झाला आहे.

रशियाचे मेजर जनरल आंद्रेई सुखोवत्स्की यांचा युक्रेनने केलेल्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावा न्यूज एजन्सी नेक्स्टाने केलेला आहे. त्याचबरोबर असेही म्हटले आहे की, रशियन सैन्याचे मोठे नुकसान केले असल्याचेही सांगण्यात आले आहे.

कीव्हपोस्टनुसार युद्धाच्या आठव्या दिवशी रशियाची ३० लढाऊ विमाने, ३७४ ऑटो मोबाइल्स टेक्निक्स, ४२  MLRS, ९०० AFV, ३१ हेलिकॉप्टर, ९० आर्टिलेरियन सिस्टम, २ कटर, २१७ टॅंक, ११ एंटीएयर डिफेंस, ३ यूएवी उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. तसेच आतापर्यंत ९००० रशियन सैनिकांना मारल्याचा दावा देखील केला आहे.

युएनने सांगितल्यानुसार रशियाने युक्रेनवर हल्ल्या केल्यामुळे आतापर्यंत २२७ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १० लाखांपेक्षा जास्त लोकांना युक्रेनमधून पलायन केलेले आहे. युक्रेनविरुद्ध सुरू असेलेले युद्ध संपविण्यासाठी माॅस्को चर्चा करण्यासाठी तयार आहे, असे रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी म्हटले आहे.

पहा व्हिडिओ : मिशन गंगा | Pudhari Podcast

Back to top button