उद्धव ठाकरे, शरद पवार माफियांना मदत करताहेत : किरीट सोमय्या | पुढारी

उद्धव ठाकरे, शरद पवार माफियांना मदत करताहेत : किरीट सोमय्या

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या १९ बंगल्यासंदर्भातील माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आली. कोविड घोटळा, बंगल्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार का बोलत नाहीत, असा सवाल करून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निशाणा साधला. आज (बुधवार) राज्यपालांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्यातील सर्व घोटळे माहीत असताना मुख्यमंत्री ठाकरे एकही शब्द बोलत नाहीत. राज्यातील मंत्र्यांचा भ्रष्टाचार, घोटाळा यावर मुख्यमंत्र्यांना जनतेला उत्तर द्यावे लागले. उद्धव ठाकरे आणि शरद पवार माफियांना मदतच करत आहेत, असा आरोपही सोमय्या यांनी यावेळी केला. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची सर्व कारस्थाने आता बाहेर येऊ लागली आहेत. ईडीच्या चौकशीच्या निष्कर्षाची वाट पाहत आहे. नवाव मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचेही किरीट सोमय्यांनी सांगितले.

दरम्यान, दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी, केंद्रीय तपास यंत्रणा माफिया टोळी प्रमाणे मागे लावल्याचा गंभीर आरोप केला आहे. २० वर्षानंतर चौकशी का केली जात आहे?. किरीट सोमय्यांनी भाजपच्या नेत्यांची काही प्रकरणे ईडीकडे दिली आहे. त्याचं काय झालं? त्यांची चौकशी का केली जात नाही? असे सवाल त्यांनी केले आहेत.  या आरोपांवर किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नवाब मलिक यांच्या चौकशीदरम्यान ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीची जोरदार घोषणाबाजी

Back to top button