बारामती : मृत्यूनंतरही ‘त्याचे’ शव नेण्यासाठी नाही मिळाला रस्ता! | पुढारी

बारामती : मृत्यूनंतरही 'त्याचे' शव नेण्यासाठी नाही मिळाला रस्ता!

बारामती : पुढारी वृत्तसेवा

आपल्या घराकडे जाण्यासाठी रस्ता हवा, यासाठी तो व्यवस्थेशी झगडला, झटला; तरी या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाने त्याला दाद दिली नाही. अखेर तो निराश झाला, आजारी पडला, घराकडील रस्त्याचा ध्यास घेत अखेर गेला. त्याचे शव घेऊन आलेली शववाहिकाही त्याच्या घरापर्यंत पोहचू शकली नाही. आता प्रशासनाने त्याच्या घराकडील रस्ता खुला करण्यासाठी गुरुवारचा (दि. २४) दिवस नक्की केला आहे. ही दुर्दैवी कर्मकहाणी आहे बारामती तालुक्यातील थोपटेवाडी येथील नीलेश बिंटू कर्वे (वय २३) या नाभिक समाजातील युवकाची.

Ukraine crisis : लुहांस्‍क आणि डोनेस्‍टक प्रांत स्‍वतंत्र देश : पुतीन यांची घोषणा, भारताने व्‍यक्‍त केली चिंता

nilesh karve
नीलेश कर्वे

नीलेश त्याच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या प्रश्नासाठी शासनदरबारी सातत्याने भांडत होता. त्याने ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती, तहसील कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता. अनेकदा हेलपाटे मारूनही त्याला हयातीत घराकडे जाण्यासाठी रस्ता मिळालाच नाही. त्यातूनच तो निराशेत गेला. गत आठवड्यात तो आजारी पडला. आजार बळावल्यावर त्याला उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले. उपचारांदरम्यान सोमवारी त्याचा मृत्यू झाला.

आता बनणार कोरोनावरील ‘वैश्विक लस’!

सोमवारी (दि. २१) त्याचा मृतदेह गावी आणला. परंतु, तो घराकडे नेण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. शववाहिकाच ग्रामपंचायतीसमोर आणून थांबविण्यात आली. त्यानंतर पोलिस प्रशासन, महसूल, पंचायत समिती, राजकीय पदाधिकाऱ्यांची पळापळ झाली. अखेर समजूत घातल्यानंतर नीलेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संगमनेर : मेंढवनात बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

नीलेशच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर लगतच्या एका व्यक्तीने कुंपण घातले आहे, ते काढावे, असे आदेश तहसीलदार, पंचायत समितीने देऊनही पुढे कार्यवाही झाली नाही. अखेर वडगावचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे, पंचायत समितीचे गटनेते प्रदीप धापटे यांनी मध्यस्थी केली. नीलेशच्या मृत्यूनंतर अखेर ग्रामपंचायतीने वडगाव पोलिस ठाण्याला पत्र देत २४ फेब्रुवारीला रस्ता काढून देण्यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे.

हेही वाचा

Watch Video : आर्किमिडीज सिद्धांतामुळेच वाचला खड्ड्यात पडलेला हत्ती

Share Market Updates : रशिया-युक्रेन संघर्षाचं शेअर बाजारात टेन्शन! काही मिनिटांत ६ लाख कोटी बुडाले , क्रिप्टोकरन्सीही घसरली

Durlabh Kashyap : फेसबुकवरून खुनाच्या सुपारीची जाहिरात करणारा दुर्लभ कश्यप आहे तरी कोण?

Back to top button