संगमनेर : मेंढवनात बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू | पुढारी

संगमनेर : मेंढवनात बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या नरडीचा बिबट्याने घोट घेतल्याची दुर्दवी घटना संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारारातील कारथळवाडी येथे घडली. या घटनेमुळे परिसरात रात्रीचे शेतात पाणी भरण्यास जाणाऱ्या व्यक्तींच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

हिराबाई एकनाथ बढे (वय- 45) असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत समोर आलेली अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारातील कारथळवाडी येथे राहत असलेल्या हिराबाई बढे या सोमवारी रात्री शेतात पाणी भरण्यासाठी गेल्या असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला, त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांच्या गळ्याला बिबट्याच्या दातांच्या खोलवर जखमा झाल्या होत्या, त्यामुळे त्यांना जखमी अवस्थेमध्ये त्यांना तात्काळ लोणी येथील प्रवरा ग्रामीणरुग्णा लयात उपचाराकरिता हलविण्यात आले होते, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दवीमृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्र पाल सागर माळी, वनपाल प्रशांत पुंड, वनरक्षक संतोष पारधी, एस. बी. सोनवणे सहित वन कर्मचाऱ्यांनी प्रथमघटनास्थळी धाव घेत लोणी येथे जाऊन विचारपूस केली होती. मात्र या दुर्दवी घटनेने मेंढवण परिसरावर शोककळा पसरली आहे. महिलेचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्यास जेरबंद करण्यासाठी वन विभागाने त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी मच्छिन्द्र बढे व विनायक काळे यांनी केली आहे.

हे वाचलंत का? 

Back to top button