बारामती : आधी देवीचे दर्शन, मग मारला दानपेटीवर डल्ला! | पुढारी

बारामती : आधी देवीचे दर्शन, मग मारला दानपेटीवर डल्ला!

बारामती : पुढारी वृत्तसेवा

बारामती तालुक्यातील होळ येथील प्रसिद्ध देवस्थान अशी ओळख असलेल्या श्री. ढगाई देवी मंदिरातील दानपेटीवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना सोमवारी (दि. २१) सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी दानपेटीवर डल्ला मारण्यापूर्वी देवीचे दर्शन घेतले असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. दरम्यान वडगाव निंबाळकर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

 

Gabhara
गाभाऱ्याच्या दरवाजाचे कुलुप तोडून चोरी करण्यात आली.

होळ येथे निरा नदीकाठी हे मंदिर आहे. रविवारी (दि. २०) सायंकाळी पूजा-आरती आटोपून येथील पुजारी घरी गेले. सोमवारी सकाळी ते दैनंदिन पूजेसाठी गेले असताना गाभाऱ्याच्या दरवाजाचे कुलुप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. आतील मंदिरातील दानपेटी जागेवर नसल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ ग्रामस्थांना माहिती दिली. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याला खबर देण्यात आली. मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणेत दोघे चोरटे दानपेटी घेऊन जाताना दिसत आहेत.

नारायण राणेंच्या बंगल्यात पालिका पथक दाखल; जुहू तारा रोडवर पोलीस बंदोबस्त

लाटे येथील पुण्यमाता आईसाहेब मंदिरातही गत महिन्यात चोरी झाली होती. त्यानंतर पुन्हा या भागातील प्रसिद्ध ढगाई देवी मंदिरात चोरी झाल्याने भाविकांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. दानपेटीत नेमकी किती रक्कम होती, याची माहिती उपलब्ध झालेली नाही.

हेही वाचा

EPFO : ईपीएफओ १५ हजारांपेक्षा जास्त वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवी पेन्शन योजना आणणार?

गडहिंग्लज : शिवरायांचा सच्चा मावळा! सदर्‍याला आग; मात्र झेंडा खाली ठेवला नाही

Russia vs Ukraine : रशियाचे लष्करी टॅंक युक्रेनच्या दिशेने रवाना

Back to top button