सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘दुपारनंतर राऊत सगळे चॅनल टेकओव्हर करतील!’ | पुढारी

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘दुपारनंतर राऊत सगळे चॅनल टेकओव्हर करतील!’

पुणे : पुढारी ऑनलाईन

शिवसेना नेते संजय राऊत आज दुपारी पत्रकार परिषदेत काय गौप्यस्फोट करतात याकडे सामान्य माणसांनाच नव्हे तर राजकीय नेत्यांनाही उत्सुकता लागून राहिली आहे. त्याचा प्रत्यय पुण्यातील एका कार्यक्रमात आला. राष्ट्रवादी कँाग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमात, ’आता सकाळीच काय ती पब्लिसिटी करून घ्या, दुपारनंतर संजय राऊत सगळे चॅनल टेकओव्हर करतील’ असे वक्तव्य करून राऊतांच्या पत्रकारपरिषदेबाबत उत्कंठा आणखी वाढवली आहे.

नाशिकमधून शेकडो शिवसैनिक मुंबईकडे रवाना ; राऊतांच्या पाठबळासाठी शक्तीप्रदर्शन

पुण्यात एका कार्यक्रमासाठी भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी चंद्रकांत पाटलांनी राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर भाष्य केले. त्याचाच धागा पकडून सुप्रिया सुळे यांनी हा टोला लगावला. त्या म्हणाल्या चॅनलवाले आमच्या कॉमेंट्सवर चालवता…मग तुम्ही आम्हाला त्याचे पैसे दिले पाहिजेत. मात्र आता जे काही करायच आहे ते दुपारी ३ वाजण्याच्या आत करू. ३ नंतर राऊतांचा बोलबाला असेल.

गुजराती उद्योगपतीकडून देशाच्या इतिहासात सर्वांत मोठा बँक घोटाळा; CBI आणि SBI वर प्रश्नचिन्ह !

आपण वाट बघू ते काय बोलतात ते. ते काहीतरी महत्त्वाचे बोलतील, कारण त्यांनी तसा इशाराच दिला आहे. सगळा देश त्यांना बघणार आहे. मी पण बघणार आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

संजय राऊत काल म्हणाले, ईडीने शिवसेनेची पत्रकार परिषद पहावी आणि आज ईडीची मुंबईत धडाधड छापेमारी !

चंद्रकांत पाटील म्हणाले की, आज सकाळपासूनच मला सगळेजण विचारताहेत कीराऊत काय बोलणार? आता ते मला कसे  कळणार? त्यातच चंद्रकांत पाटलांनी आपल्या भाषणात सुप्रिया सुळेंना राज्यसभेच्या खासदार संबोधले… चूक लक्षात येताच त्यांनीसुधारणा केली; मात्र ‘काल दत्ता भरणे मामा फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणाले, आज मी तुम्हाला अस बोललो’, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी वेळनिभावून नेली.

हेही वाचा

मुंबई-पुणे एक्‍स्‍प्रेस वेवर भीषण अपघात; काँग्रेस नेत्‍यासह सोलापूरचे ४ जण ठार

UP Election : सायकलचं बटण दाबलं की, कमळाला मत दिल्याची स्लिप !

चारा घोटाळ्यातील पाचव्या केसमध्ये लालू प्रसाद यादव दोषी

Back to top button