लखनऊ, पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच दुसरा टप्पा पार पडला. पण, यंत्रात गडबड झाल्याचा आरोप समाजवादी पक्षानं केला आहे. सायकल चिन्हावरचं बटण दाबलं की, मत कमळाला मत असल्याची स्टिप मिळत असल्याची तक्रार समाजवादी पक्षानं निवडणूक आयोगाकडे केली आहे. समाजवादी पक्षानं यासंदर्भातील एका मतदाराचा व्हिडीओ पुरावा म्हणून ट्विटरवर शेअर केला आहे. (UP Election)
या प्रकरणासंदर्भात निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी समाजवादी पक्षानं केली आहे. "मुरादाबाद ग्रामीण विधानसभा २७, बूथ क्रमांक ४१७ वर सायकल चिन्हावर बटण दाबूनही कमळाला मतदान दिल्याची चिठ्ठी मतदारांना मिळत आहे. हे अतिशय गंभीर प्रकरण असून यात निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनानं माहिती घेऊन निष्पक्ष चौकशी करावी", असं समाजवादी पक्षानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे.
रामपूरमध्ये बूथ ताब्यात घेतल्याचाही आरोपी समाजवादी पक्षानं केलेला आहे. यापूर्वीही सहारनपूर जिल्ह्यातील बेहट विधानसभा मतदार संघाच्या बूथ क्रमांक १७० वर देखील सायकल चिन्हातं बटण दाबल्यानंतर कमळ चिन्हाची स्लिप येत असल्याचा आरोप समाजवादी पक्षानं केलेली आहे. या संदर्भात सोशल मीडियावर युजर्सच्या समिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. (UP Election)
हे वाचलंत का?