पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात संजय राऊतांच्या मदतीने लोकांच्या जीवाशी खेळ मांडला. असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. सोबतच माझ्यावर हल्ला करणाऱ्या लोकांना अटक करावी असेही किरीट सोमय्या म्हणाले आहेत. माझ्यावर हल्ला करणाऱ्या गुंडाना पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांकडून अभय का दिले जात आहे? असा सवालही किरीट सोमय्या यांनी केला आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेत झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रशांत लाडे (वय 30) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, भादवी कलम 143, 147, 149, 341, 336, 337, 323, 504 तसेच मु. पो. अॅक्ट कलम 37(1) सह 135 नुसार शहरअध्यक्ष संजय मोरे, पदाधिकारी चंदन साळुंके, किरण साळी, सुरज लोखंडे, आकाश शिंदे, रूपेश पवार, राजेंद्र शिंदे, सनि गवते यांच्यासह 60 ते 70 महिला व पुरूष कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचलतं का?