पुणे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चार महिन्यांची गर्भवती असल्याने घृणास्पद प्रकार समोर | पुढारी

पुणे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चार महिन्यांची गर्भवती असल्याने घृणास्पद प्रकार समोर

पुणे, पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील लोणी काळभोर परिसरात अकरा वर्षाच्या मुलीलावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले. आणि गर्भवती होण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तात्‍काळ गुन्हा नोंद करत आरोपीला करून तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत.

या नराधमाचे सोनू उर्फ सिध्दाम ज्ञानेश्वर भालेराव (रा. बोरकर वस्ती, उरूळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) असे या आरोपीचे नाव आहे. याबाबत पिडीत मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याच्यावर बलात्कार व पॉस्कोच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पिडीत मुलीच्या वडीलांच्या ओळखीचा असून ऑक्टोबर 2021 मध्ये घरी कोणी नसताना तो त्‍यांच्या घरी आला. त्याने मुलीला बाथरूममध्ये ओढत नेत तिच्या तोंडाला रूमाल बांधून, तिच्यासोबत घृणास्पद प्रकार केला. त्‍यानंतर 6 फेब्रुवारी रोजी पिडीत मुलीने आईला पोटात दुखत असल्याबाबत सांगितले. त्यानंतर वडीलांनी तिला चिंचवड येथील रूग्‍णालयात नेले. डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ती चार महिन्यांची मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले. त्यानंतर तिला याबाबत विचारणा केली असता तिने भालेराव याने अत्याचार केले असल्याचे सांगितले. त्यानंतर भालेराव याला पोलिसांनी अटक केली. गुन्ह्याचा पुढील तपास लोणी-काळभोर पोलिस करत आहेत.

 हे ही वाचलं का

Back to top button