घरातच उपचार अन् खणखणीत बरे | पुढारी

घरातच उपचार अन् खणखणीत बरे

पिंपरी : मिलिंद कांबळे : तिसर्‍या लाटेत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे तसेच काहीही लक्षणे नाहीत. तसेच, कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याने आजाराचा गंभीर परिणाम होत नाही.

मोठ्या संख्येने रुग्ण घरीच राहून उपचार घेऊन बरे होत आहेत. त्यामुळे नागरिकांमधील कोरोनाची भीती मोडल्याचे दिसत आहे. तिसर्‍या लाटेतील ओमॉयक्रानचे रुग्ण सापडू लागले.

पुणे : पत्नी व सासरच्या जाचाला कंटाळून भारतीय सैन्य दलातील जवानाची आत्महत्या

त्यानंतर 25 डिसेंबरपासून शहरातील रुग्णसंख्या वाढून लागली. ती केवळ 25 दिवसांत 5 हजार 200 पर्यंत पोहोचली होती. त्यामुळे चाचण्याची संख्या वाढविण्यात आली होती.

दररोज 10 ते 12 हजार जणांची चाचण्या केल्या जात होत्या. ती संख्या आता 6 ते 8 हजार आहे. त्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सध्या 1 हजाराच्या आसपास आली आहे.

भीमा-कोरेगाव प्रकरणी शरद पवारांना नोटीस; पुन्हा साक्ष नोंदवली जाणार

सोमवारपर्यंतच्या (दि.7)आकडेवारीनुसार शहरात 7 हजार 81 सक्रिय रूग्ण होते. लक्षणेविरहीत व सौम्य लक्षणे असलेले तब्बल 6 हजार 825 रूग्ण घरीच राहून उपचार घेत आहेत. घरी राहून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधे घेतल्याने ते सात दिवस बरे होत असल्याचे सकारात्मक चित्र आहे.

‘त्या’ याचिकेवर सर्वोच्च न्यायालय घेणार सुनावणी

शहराची एकूण रुग्ण स्थिती
कोरोनाबाधित : 3 लाख 55 हजार 519
बरे झालेले : 3 लाख 45 हजार 156
कोरोनाबाधित मृत्यू : 4,597
चाचण्या : 27 लाख 39 हजार 746
आतापर्यंतचे डोस : 33 लाख 26 हजार 909

मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमण्याचा निर्णय

बूस्टर डोस वाढले
कोरोना प्रतिबंधक डोस घेतल्याने कोरोनाचा प्रभाव कमी होत असून, गंभीर परिणाम होत नसल्याचे चित्र आहे. तर, शहरात 33 लाख 20 हजार 623 डोस दिले गेले आहेत. पहिला डोस 100 टक्के पूर्ण झाल्याचे चित्र आहे. तर, दुसरा डोस घेणार्‍यांची संक्या 90 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. बूस्टर डोस घेण्याची संख्याही वाढत आहे.

 

Back to top button