अनधिकृत जाहिरातींवर कारवाईची पुणे महापालिकेची वल्गना ठरली फोल | पुढारी

अनधिकृत जाहिरातींवर कारवाईची पुणे महापालिकेची वल्गना ठरली फोल

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पथदिव्यांच्या खांबावर केबल टाकणार्‍यांवर, जाहिरात फलक लावणार्‍यांवर फौजदारी आणि दिवाणी कारवाई करण्याची महापालिका प्रशासनाची वल्गना फोल ठरली आहे. अशा प्रकारची एकही कारवाई अद्याप झाली नसल्याचे उजेडात आले आहे.
सार्वजनिक प्रकाश व्यवस्थेसाठी महापालिकेने शहरात पथदिवे उभारले आहेत. या पथदिव्यांच्या खांबावरून केबल टाकून काही कंपन्या, संस्था अनधिकृतपणे व्यवसाय करीत आहेत. याच खांबांवर अनधिकृतपणे जाहिरात आणि इतर फलकही लावले जातात. यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असतो. या केबलमुळे महापालिकेच्या पथदिव्यांच्या खांबांचेही नुकसान होते. तसेच शहराच्या विद्रुपीकरणात वाढ होते.

सिंह गिधाडाच्‍या धमकीला घाबरत नाही : फडणवीस यांचा राऊतांवर पलटवार

या पार्श्वभूमीवर पथदिव्यांच्या खांबांवर अनधिकृत केबल, जाहिरात फलक कोणीही बांधू किंवा लावू नये. या आदेशाचा भंग करणार्‍यांविरुद्ध महाराष्ट्र महानगरपालिका कायदा 1949 कलम 376 (2) आणि महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपीकरणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधित व्यक्तीवर दिवाणी अथवा फौजदारी खटला दाखल करण्याचा इशारा विद्युत विभागाने दिला होता. तसेच नागरिकांनी विद्युत पोल व फिटिंगसंबंधित कोणती असुरक्षित परिस्थिती आढळल्यास अथवा दिवा बंद असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक (18001030 222) आणि व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर (9689900002) संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते. प्रशासनाने कारवाईचा इशारा दिला, मात्र अद्याप एकही कारवाई झालेली नाही.

NZvsIND : न्यूझीलंडचा भारतीय महिला संघावर 18 धावांनी विजय

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून जाहिरातबाजी केली जात आहे. याला पथदिव्यांचे खांबही अपवाद नाहीत. महापालिकेकडून कारवाई होत नसल्यानेच हे फलक लावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यासंदर्भात विद्युत विभागाच्या सूत्रांनी कायदेशीर कारवाई करण्यात अडचणी येतात, यामुळे ती केली जात नाही असे, तर क्षेत्रीय कार्यालयामार्फत ही कारवाई करण्यासाठी विचार सुरू असल्याचे नमूद केले.

जळगाव : वारंवार लग्नाच्या मागणीमुळे तरुणाची नदीत उडी घेवून आत्महत्या

लोककलावंतही होत आहेत टेक्नोसॅव्ही; टेक्नॉलॉजीने होत आहेत मोठे बदल

पुण्यात 11 लाख लोकांनी अजूनही दुसरा डोस घेतलेलाच नाही!

Back to top button