पिंपरी-चिंचवड, मावळात ‘होम स्टे’ संकल्पना धरतेय बाळसे

Pimpri-Chinchwad, Mawla holds the concept of 'Home Stay'
Pimpri-Chinchwad, Mawla holds the concept of 'Home Stay'
Published on
Updated on

पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर : पर्यटकांना अतिशय स्वस्त दरात घरगुती पद्धतीने राहण्याची व जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून देणारी होम स्टे संकल्पना पिंपरी चिंचवड व विशेषत: मावळात चांगलेच बाळसे धरू लागली आहे.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने अशा खासगी व्यक्तींना प्रमाणपत्र देऊन त्यांची वेबसाईटवर प्रसिद्धी करण्याची योजना राबवायचे ठरविले आहे. त्यामुळे पर्यटकांना स्वस्त दरात विश्वासार्ह ठिकाणी जेवण व राहण्याची व्यवस्था उपलब्ध होणार आहे.

कोरोनामुळे पर्यटकांवर बंधने आल्यामुळे पर्यटन व्यवसाय अडचणीत आला. पर्यटन व्यवसायावर आधारलेले टुरिस्ट गाड्या, हॉटेल्स, रिसॉर्ट आणिय तेथे काम करणारे कर्मचारी, पर्यटनस्थळी छोटे-मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक अडचणीत आले.

पिंपरी चिंचवड परिसर आणि मावळात अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यात चिंचवडचे श्रीक्षेत्र मोरया गोसावी मंदिर, चापेकर बंधू स्मारक, दुर्गादेवी टेकडी, तीर्थक्षेत्र देहू, आळंदी, कार्ला येथील लेणी, एकवीरा देवी, लोणावळा येथील भुशी धरण, टायगर व लायन्स पॉईंट, गिधाड तलाव, सहारा पूल धबधबा, घोरवडेश्वर, दुधीवरे येथील प्रति पंढरपूर, शिरगाव येथील प्रतिशिर्डी, बिर्ला गणपती, लोहगड, विसापूर किल्ला, हाडशी आदींचा समावेश आहे.

मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे पर्यटनावर घातलेल्या बंधनांमुळे पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. आता पर्यटनस्थळे खुली झाल्याने पर्यटनास चांगले दिवस येण्याची आशा व्यावसायिकांना आहे.

प्रसिद्ध पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी होत असते. पर्यटकांच्या निवास व्यवस्थेसाठी विविध हॉटेल्स, रिसॉर्ट सज्ज असतात. पर्यटकांना पर्यटनस्थळाला भेट देण्यासोबतच स्थानिक खाद्यसंस्कृती, लोकसंस्कृती यांचाही अनुभव हवाहवासा वाटतो.

महागडी हॉटेल्स सामान्यांना परवडत नाहीत. सीझनमध्ये तर पर्यटनास जाणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाते. त्यासाठी होम स्टे ही चांगली संकल्पना आहे.

आपल्या राहत्या घरातील वापरात नसलेल्या खोल्यांचा उपयोग होमस्टे संकल्पनेच्या माध्यमातून पर्यटकांसाठी केला जाऊ शकतो. त्यातून आपल्या स्थानिक खाद्य संस्कृतीचा अनुभव सुद्धा पर्यटकांना मिळू शकतो.

दुसरीकडे स्थानिकांना रोजगार मिळतो. केरळ, उत्तराखंड, उत्तरांचल, कर्नाटक, राजस्थान अशा काही राज्यांमध्ये तसेच महाराष्ट्रातही कोकणात होम स्टे ही संकल्पना मूळ धरत आहे. आता पिंपरी चिंचवड आणि मावळात ही संकल्पना रुजू पाहत आहे.

"महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळच्या (एमटीडीसी) निवास व न्याहरी योजनेंंतर्गत होम स्टे नोंदणीकृत करता येते. अशा नोंदणीसाठी पाच वर्षांसाठी 5 हजार रुपये शुल्क आकारले जाते.

त्या बदल्यात एमटीडीसी होम स्टे संकल्पना राबविणार्‍यांना प्रमाणपत्र देते.ते एमटीडीसीचा लोगो वापरू शकतात. एमटीडीसीच्या वेबसाईटवर त्यांची माहिती प्रसिद्ध केली जाते.

त्यामुळे पर्यटक त्यांच्याशी संपर्क साधू शकतात. एमटीडीसीचे प्रमाणपत्र मिळाल्याने त्यांना अधिक व्यवसाय उपलब्ध होतो. कमर्शियलऐवजी रेसिडेन्शिअल दराने त्यांना वीज आकारणी केली जाते. तसेच, कमर्शिअल गॅसऐवजी घरगुती गॅस उपलब्ध होतो.

स्थानिकांना रोजगार तर पर्यटकांना स्वस्त दरात राहण्याची व जेवण्याची व्यवस्था उपलब्ध होते. मावळात व काही प्रमाणात पिंपरी-चिंचवडमध्ये ही संकल्पना हळूहळू रुजत आहे."
                                                                            – दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी पुणे विभाग

https://youtu.be/gUWZqZyNLD0

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news