पुढारी ऑनलाईन डेस्क : 'व्हॅलेंटाईन डे' ( Valentine Day ) ची वाट प्रेमी युगुल दरवर्षी पाहत असतात. फेब्रुवारी महिन्याच्या ७ तारखेपासून व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात होते. या वीकमध्ये आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देऊन प्रेम व्यक्त केले जाते. 'पार्टनरला दिलेली भेटवस्तू त्याला आवडेल की नाही?' ,'पार्टनरच्या आवडीनिवडी काय असतील?', 'दिलेली भेट वस्तू पार्टनर वापरेल की नाही?' असे अनेक प्रश्नांचा गुंता यावेळी मनात घेर घालतात. यामुळे 'व्हॅलेंटाईन डे' स्पेशल बनविण्यासाठी तुम्ही आपल्या प्रियजनांना 'या गोष्टी भेटवस्तू म्हणून देऊ शकता.
'व्हॅलेंटाईन डे' ( Valentine Day ) ला तुम्ही तुमच्या प्रियजनांना रोमँटिक लॉकेट देऊ शकता. हृदयाच्या आकाराचे रोमँटिक लॉकेट 'व्हॅलेंटाईन डे' साठी आकर्षणाचा विषय असतो. किंवा प्रेमाचे काही गोड शब्द दोन लॉकेट एकत्रित केले असता पूर्ण होणारे एक लॉकेट. जेणेकरून ते एकमेकांकडे ठेवता येईल. अशी खास भेटवस्तु नेहमी स्मरणात राहिल.
जर या व्हॅलेंटाईनडेला तुम्ही त्याच्यापासून दूर असाल तर दूराव्यातून निर्माण झालेल्या प्रेमाच्या अव्यक्त भावना व्यक्त करण्यासाठी हेच गिफ्ट अगदी योग्य ठरेल. कधी-कधी दूर असल्यामुळे मेसेज अथवा फोनवरून आपल्याला आपल्या मनातील भावना आहेत तशा व्यक्त करता येत नाहीत. किंवा- कधी कधी समोरच्या व्यक्तीपर्यंत त्या आहेत तशा पोहचतही नाहीत. या व्हॅलेंटाईनला तुम्हाला त्याच्यापासून दूर राहावं लागणार असेल तर तुमच्या मनातील भावना रेकॉर्ड करा आणि व्हॅलेंटाईन डे एसएमएस लव्ह मेसेज त्याच्यापर्यंत कुरिअर करा. या गिफ्टमुळे तुमच्यामधील प्रेमबंध आणखीनच दृढ होतील.
कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून व्हॅलेंटाईन डे एका वेगळ्या अंदाजात साजरा केला जाऊ शकतो. आपल्या प्रिजनाला भेटता येत नसेल. किंवा कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागत असेल तर वेब कॅम हे गिफ्ट खूप भारी आहे. या खास दिवसाचे सेलेब्रेशन करायचे असल्यास ही भेटवस्तु खूपच सुंदर आहे.
व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या पार्टनरला एक सुंदर कॉफी मग गिफ्ट करू शकता. तुम्हाला मार्केट आणि ऑनलाईन हा मग सेट सहज उपलब्ध करता येईल. या सेटमध्ये हार्ट शेप असणारा रेड मग, सुंदर कोट असणारे मग यांचा समावेश होतो. कॉफी मग ऐवजी हार्ट शेफचे कुशन गिफ्टी करू शकता. कुशनवर तुमच्या मनातील भावना पेंटद्वारे व्यक्त करू शकता. तसेच, हार्ट वाला इमोजी कुशनदेखील देऊ शकता.
'व्हॅलेंटाईन डे'ची स्पेशल कपल टी-शर्ट तुम्ही त्याला नक्कीच देऊ शकता. हे गिफ्ट तुम्ही दोघंही वापरू शकता. फोटोसेशनसाठी हे अगदी परफेक्ट गिफ्ट आहे. शिवाय जेव्हाजेव्हा तुम्ही हे टी-शर्ट घालाल तेव्हा तुम्हाला त्याची विशेष आठवण येईल.
तुम्ही तुमच्या प्रियजनांनसाठी स्वतःच्या हाताने हार्ट शेपचे चॉकलेट्स अथवा केक तयार करू शकता. असे क्यूट गिफ्ट मिळाल्याने तुमच्या पार्टनरला खूपच आनंद होईल यात शंका नाही.
या प्रेमदिनी ह्रदयाच्या आकारातील पेडंट अथवा रिंग तुम्ही तिला गिफ्ट करू शकता. या गिफ्टचा एक फायदा हा की हे गिफ्ट सतत तिच्या ह्रदयाजवळ राहील. ज्यामुळे तुम्ही तिच्या ह्रदयात सतत असाल.
तुम्ही बॅटरी ऑपरेटेड फोटो क्लिप्स लाईट्स रूममध्ये लावून आपल्या प्रियजनाला वॅलेंटाईन्स दिनी सरप्राईज देऊ शकता.
आकर्षक आणि मनमोहक अशा दागिन्यांची निवड आपण भेट म्हणून करु शकतो. आपल्या प्रियजनाला असा दागिना द्या जेणेकरून त्या दागिन्यामध्ये तुमचे फोटो ठेवता येईल.
हेही वाचलंत का?