पुणे, पुढारी वृत्तसेवा : शिळ्या भाजीवरून आजीचा आणि नातवाचा वाद झाला. यावेळी नातवाने आजीला गरम तेलावर ढकलून दिले व मारहाण केली त्यामध्ये आजीचा मृत्यू झाला. मथुराबाई पांडुरंग कोळेकर ( वय 72,रा. आंबेडकरनगर वसाहत ) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.
यानंतर या प्रकरणी पोलिसांनी लक्ष्मण बाबू पांढरे ( वय २४) याला ताब्यात घेतले आहे. ही घटना मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर वसाहतीत घडली आहे. आरोपी नातवाने आजी घसरून पडल्यामुळे तीचा मृत्यू झाल्याचा बनाव केला होता. मात्रा पोलिसांच्या नजरेतून त्याचा बनाव जास्त वेळ टिकू शकला नाही. अखेर चौकशीच्यावेळी त्याच्याकडून झालेल्या मारहाणीत आजीचा मृत्यू झाल्याची कबुली दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लक्ष्मणला दारूचे व्यसन आहे. तो नेहमी घरात दारू पीत असे व आजी बरोबर भांडण काढत असे घरांमध्ये लक्ष्मणा खाजगी ठिकाणी ड्रायव्हिंगचे करतो. दुपारच्या दरम्यान लक्ष्मणचा सोबत वाद झाला. त्यावेळी त्याने आजीला जोरदार आपटले व मारले त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तो घराला कुलूप लावून बाहेर निघून गेला होता. दुपारी साडेतीनच्या दरम्यान पुन्हा घरी आला दरवाजा उघडला.
दरम्यान, शेजारी लोकांनी आज उशीर झाला तरी आजी बाहेर कशी आली नाही म्हणून पहाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेजा-यांना आजी मृत अवस्थेत पडलेल्या दिसून आली. त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. त्यावेळी लक्ष्मण बाहेर पळून गेला होता. घटनास्थळी मार्केट पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे यांनी भेट दिली. लक्ष्मणची माहिती घेतली असता तो मार्केट परिसरात फिरत आहे असे समजले त्यानंतरमार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या पथकाने पळून जात असताना लक्ष्मणाला मार्केट यार्ड पीएमपीएल बस स्थानकाजवळ पकडले.
हे ही वाचलं का