जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० हद्दपार करूनही तब्बल १०९ जवान शहीद, ९८ नागरिकांचा बळी | पुढारी

जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० हद्दपार करूनही तब्बल १०९ जवान शहीद, ९८ नागरिकांचा बळी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : जम्मू आणि काश्मीरचा (Jammu and Kashmir) विशेष दर्जा रद्द केल्यापासून ५४१ दहशतवादी (Terrorist) घटनांमध्ये १०९ सुरक्षा दलांचे जवान शहीद झाले आहेत. प्रत्येक ४ दहशतवाद्यांच्या मागे एका जवानाचा बळी गेला आहे. राज्यातील कलम 370 हटवल्यानंतरही येथे शांतता प्रस्थापित झालेली नाही, असे दिसून येते.

गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, 5 ऑगस्ट 2019 पासून जम्मू-काश्मीरमध्ये 439 दहशतवादी मारले गेले आहेत. मात्र, दरम्यानच्या काळात दहशतवादी हल्ल्यात 98 नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय सुमारे ५.३ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तथापि, दहशतवादाविरुद्ध सुरक्षा दलांच्या मोहिमेदरम्यान कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले नाही.

दहशतवादविरोधी 2022 मध्ये माेहीम

जानेवारीच्या अखेरीसही सुरक्षा दलांनी (security forces) जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर झाहिद वानी आणि एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश आहे.

सध्या देशात 16 हजाराहून अधिक खासगी सुरक्षा संस्थांना सक्रिय परवाने आहेत. त्यांच्या लेखी उत्तरात राय यांनी AIADMK खासदार विजयकुमार यांच्या प्रश्नाला उत्तर दिले की सध्या देशात किती खासगी सुरक्षा एजन्सी कार्यरत आहेत. राय म्हणाले की, सध्या देशात 16 हजार 427 खासगी संस्थांकडे सक्रिय परवाने आहेत. विशेष म्हणजे खासगी सुरक्षा संस्था सरकारच्या परवानगीशिवाय काम करू शकत नाहीत.

हे ही वाचलं का  

Back to top button