पैसे दुप्पट करून देतो असे सांगून ज्येष्ठाची ५० हजाराची फसवणूक | पुढारी

पैसे दुप्पट करून देतो असे सांगून ज्येष्ठाची ५० हजाराची फसवणूक

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा

आठ दिवसात पैसे दुप्पट करून देतो. या तीन पुडया घरातील देव्हाऱ्यात ठेवा, असे सांगून ज्येष्ठ नागरिकाची ५० हजार रुपयांची फसवणुक केल्याची घटना घडली आहे. चिमाजी सिताराम बांगर (वय ७५, रा. कुडे बु., ता. खेड ) असे फसवणुक झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबत किसन गोवींद कचरे मुळ (रा. पळसुंदे, ता. अकोले, जि. अहमदनगर, सध्या रा. उदापुर, ता. जुन्नर ) याच्या विरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारत बायोटेकच्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या बूस्टर डोसच्या परिक्षणास DCGI कडून परवानगी

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महीन्यापूर्वी फिर्यादी यांचे मेव्हणे यांनी फिर्यादीला फोन करून सांगतले की, कचरे नावाचा माणूस खेड येथे येणार आहे. तो पैसे डबल करून देतो. तुम्ही पन्नास हजार रूपये घेऊन खेड एस. टी. स्टॅन्ड येथे लिंबाच्या झाडाखाली जाउन त्याची भेट घ्या. तो धोतर नेसलेला आहे अशी खुणही त्यांना सांगीतली. फिर्यादीने सांगितल्याप्रमाणे कचरे या इसमाला पैसे दिले.

पदोन्नतीतील आरक्षणाच्या अटी कमी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

त्यावेळी त्याने फिर्यादिला सांगीतले की तातळे नावाच्या एका साहेबांचे मी काम केले आहे. तुमचेही पैसे दुप्पट करून देतो. असे सांगुन त्याने तिन पुडया दिल्या. त्या पुडया तुम्ही तुमच्या घरात देव्हाऱ्यात ठेवा. मी तुमचे घरी आठ दिवसात येईन त्या वेळेस मी त्या पुडया उघडया करेन. तुम्ही तो पर्यन्त त्या पुड्या उघडायच्या नाहीत. आठ दिवसानंतर कचरे नावाचा इसम घरी आला नाही. फोन केला असता मी आजारी आहे, नंतर येतो. असे सांगुन टाळाटाळ केली. नंतर फोन बंद केला.

महाराष्ट्र विधानसभेतील भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाकडून रद्द, निलंबन घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा

चौकशी केली असता फसवणुक झाल्याचे ज्येष्ठ नागरिकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी तक्रार नोंदवली. जवळपास अडिच महिन्यात घडलेल्या या फसवणूक प्रकरणातील आरोपी शोधून काढणे हे पोलिसांसमोर आव्हान आहे. आरोपीने विविध ठिकाणी आणखी पाच कुटुंबातील व्यक्तींची अशाच प्रकारे फसवणूक केली असल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक सतिशकुमार गुरव तपास करीत आहेत.

Back to top button