Pune metro : शरद पवार यांनी केली पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो सफर - पुढारी

Pune metro : शरद पवार यांनी केली पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो सफर

पिंपरी : पुणे मेट्रो चे पिंपरी ते फुगेवाडी मार्गिका सुरू करण्यास कमिशनर ऑफ मेट्रो रेल सिफ्टीची ( Pune metro ) परवानगी मिळाली. लवकरच या मार्गावर मेट्रो धावणार आहे. या मार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह सुमारे दीड तास पाहणी केली. काम उत्तम झाल्याबद्दल पवार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांचे कोतुक केले.

पवार आज सकाळी नऊला फुगेवाडी कार्यालयात आले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ, पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, वंदना चव्हाण आणि पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यलयात महामेट्रोचे व्यवस्थपकीय संचालक डॉ ब्रीजेश दीक्षित यांनी मेट्रोचे सादरीकरण केले. त्यानंतर फुगेवाडी ते पिंपरी चिंचवड महापालिका भवन आणि परत फुगेवाडी असा पवार आणि त्यांच्या ताफाने प्रवास केला. मेट्रो संचालन, तिकीट व्यवस्था, सुरक्षा, विविध विभाग आदींची माहिती त्यांना देण्यात आली. सुमारे दीड तास पवार यांनी मेट्रोची पाहणी केली.

हेही वाचलं का? 

Back to top button