शंभराव्या नाट्यसंमेलन समारोपाचा मान तळेगावास

शंभराव्या नाट्यसंमेलन समारोपाचा मान तळेगावास

तळेगाव दाभाडे : येत्या 5 जानेवारीपासून पिंपरी-चिंचवड येथे सुरू होणार्‍या 100व्या नाट्यसंमेलनाचा समारोप बुधवारी (दि. 10) तळेगाव दाभाडे येथे होणार आहे. त्यानिमित्त ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे आणि भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते नाट्यसंमेलन कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. 31) येथे करण्यात आले. त्यानंतर तळेगाव दाभाडे (मावळ) शाखेतर्फे पदाधिकारी, सदस्य, विविध संस्था, कलाकार आणि कार्यकर्त्यांचा पूर्वनियोजन मेळावा घेण्यात आला.

या वेळी भाऊसाहेब भोईर, बबनराव भेगडे यांच्यासह शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, विश्वस्त सल्लागार ज्येष्ठ संगीत नाट्यकर्मी सुरेश साखवळकर, कार्याध्यक्ष गणेश मोहनराव काकडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी उपनगराध्यक्ष कृष्णा कारके, उद्योजक विलास काळोखे आदी उपस्थित होते. आमदार सुनील शेळके यांनी नाट्यसंमेलन समारोप कार्यक्रमाचे पालकत्व घेतल्याबद्दल परिषदेतर्फे त्यांचे आभार मानन्यात आले.

गेल्या वर्षभरातील राज्यातील राजकीय उलथापालथ आणि नाट्यपरिषदेतील राजकारण यांचा संदर्भ घेत शंभरावे मराठी नाट्यसंमेलन आयोजित करण्याचा मान पुणे जिल्ह्यास कसा मिळवला, याचे खुमासदार कथन करत अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या मध्यवर्ती शाखाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी नाट्यप्रेमी मंडळीच्या मेळाव्यात धमाल उडवून दिली.तळेगाव शहरास नाट्यसंमेलन समारोपाचा मान मिळवून दिल्याबद्दल सुरेश धोत्रे, यांनी भाऊसाहेब भोईर आणि आमदार सुनील शेळके यांचे आभार मानले. मेळाव्यास प्रणव जोशी, सचिन भांडवलकर, प्रसाद मुंगी, विश्वास देशपांडे, मीनल कुलकर्णी, सुरेश दाभाडे, नितिन शहा आदी उपस्थित होते.

तळेगावच्या सांस्कृतिक क्षेत्रास नवी ओळख मिळेल

भोईर म्हणाले, की पक्षीय राजकारणापेक्षा नाट्यपरिषदेत कोण आपल्या गटातील, कोण विरोधातील हे अखेरपर्यंत कळतच नसल्याने ते अधिक अडचणीचे होते. या सगळ्यांची सांगड घालून शंभरावे नाट्यसंमेलन पुण्यात व्हावे म्हणून मार्ग काढताना नाट्यपरिषदेचे तहहयात विश्वस्त शरद पवार, विश्वस्त उदय सामंत, अर्थमंत्री अजित पवार आणि सर्वांना आपण पटवून देत त्यात यशस्वी कसे झालो याचे किस्से सांगितले. नाट्य संमेलन समारोपामुळे तळेगाव दाभाडे शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रास नवी ओळख मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news