Nagar News : एमआयडीसीतील कामगार मराठा मोर्चासाठी रजेवर! | पुढारी

Nagar News : एमआयडीसीतील कामगार मराठा मोर्चासाठी रजेवर!

निंबळक : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाचा संघर्ष आता अंतिम टप्प्यात आलेला असून, एमआयडीसीतील सामान्य कर्मचारी या मोर्चात सक्रिय होताना दिसून येत आहेत. त्यासाठी अनेकांनी रजेचे अर्ज दिले आहेत. मराठा आरक्षणासाठी सर्वसामान्य लोकही आंदोलनात हिरीरीने सहभागी होत आहेत. मुंबईला जाणार्‍या मोर्चासाठी शेतकरी, कामगार, कर्मचारी सर्वजण सहभागी होत आहेत. काही कर्मचार्‍यांनी रजा टाकून मुंबईतील होणार्‍या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला दिसत आहे.

मराठा संघर्ष मोर्चाला जाण्यासाठी कर्मचारी रीतसर रजेचा अर्ज आगाऊ देऊन रजा मागणीचे कारण नमूद करत आहेत. मुंबईतील मराठा आरक्षण मोर्चा असे त्यामध्ये नमूद करून मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. देहरे येथील एक कर्मचारी चांगदेव रघुनाथ लांडगे हे एमआयडीसीतील साई एन्टरप्रायजेस या कंपनीत काम करतात. त्यांनी आपला रजेचा अर्ज 28 डिसेंबर रोजी आपल्या कंपनी व्यवस्थानाकडे देऊन मुंबईला जाणार्‍या मोर्चात 22 जानेवारीपासून सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षण मिळेपर्यंत ते रजेवर जाणार आहेत.

हेही वाचा

Back to top button