Dahanu 15 Coach Local Train: उमरोळी प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण; डहाणू मार्गावर 15 डब्यांची लोकल कधी धावणार?

सफाळे-उमरोळी स्थानकांवरील पायाभूत कामे पूर्णत्वास; प्रवाशांकडून तातडीने लोकल वाढीची मागणी
Dahanu 15 Coach Local Train
Dahanu 15 Coach Local TrainPudhari
Published on
Updated on

सफाळे : सफाळे व उमरोळी रेल्वे स्थानका परिसरातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या कामांना वेग मिळाला असून डहाणू मार्गावर 15 डब्यांच्या लोकलसाठी आवश्यक असलेली तांत्रिक अडचण आता जवळपास दूर झाल्याचे चित्र आहे. सफाळे स्थानकातील फाटकामुळे विभागलेला प्लॅटफॉर्म एकत्र करून पूर्ण लांबीचा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. या प्लॅटफॉर्मवर 20 डब्यांच्या मेमू पेक्षाही जास्त लांबीची गाडी उभी राहू शकते, अशी माहिती स्थानिक पातळीवर दिली जात आहे.

Dahanu 15 Coach Local Train
Tilse Devmase Mahaseer Fish: तिळसेतील ‘देवमासे’ ठरले रहस्यमय आकर्षण; वैतरणेच्या पुरातही न हलणारे महासीर मासे

याचबरोबर उमरोळी स्थानकातील प्लॅटफॉर्म लांबी वाढविण्याचे कामही पूर्ण झाल्याने डहाणू रोड रेल्वे स्थानक पर्यंत 15 डब्यांची लोकल सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली महत्त्वाची पूर्वतयारी पूर्ण झाल्याचे मानले जात आहे. वैतरणा ते डहाणू दरम्यान प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत असून लोकलमध्ये मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे या मार्गावर 15 डब्यांच्या लोकल सुरू करणे ही प्रवाशांची प्रमुख मागणी बनली आहे. दरम्यान पश्चिम रेल्वे कडून 19 फेब्रुवारीपासून मोठा बदल जाहीर करण्यात आला आहे. 12 एसी लोकल आणि 3 नवीन नॉन-एसी लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे उपनगरी लोकल सेवांची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या नव्या सेवांमुळे गर्दी कमी करण्यास मदत होईल आणि लोकल नेटवर्क अधिक सक्षम होईल, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Dahanu 15 Coach Local Train
Safale Bullet Train: बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे नुकसान; सफाळेतील 100 एकर भात शेती खाऱ्या पाण्याखाली

विरार-डहाणू मार्गावर 15 डब्यांच्या लोकल सुरू करण्यासाठी प्लॅटफॉर्म विस्तार व इतर पायाभूत कामे सुरू असल्याचे यापूर्वीही रेल्वेने स्पष्ट केले होते. या सुधारणा पूर्ण झाल्यानंतर प्रवासी क्षमतेत सुमारे 25 टक्क्यांनी वाढ होऊ शकते, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. 19 फेब्रुवारीपासून फेऱ्या वाढत असल्या तरी डहाणू विभागात थेट वाढ अपेक्षित होती. मात्र अद्याप स्पष्ट घोषणा नसल्याने प्रवासी वर्गात नाराजी दिसत आहे. पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी संसदेत तसेच रेल्वे मंत्रालय स्तरावर हा प्रश्न उपस्थित केल्याचे सांगितले जाते. तसेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे.

Dahanu 15 Coach Local Train
Palghar Fake Liquor Raid: मद्याच्या बाटल्यांवर बनावट लेबल लावण्याचा कारखाना उद्धस्त

प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाल्याने फेब्रुवारी अखेरपर्यंत डहाणू मार्गावर 15 डब्यांच्या लोकल सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. तसेच एप्रिलमध्ये येणाऱ्या नवीन वेळापत्रकात डहाणू लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ न झाल्यास प्रवाशांचा विश्वास कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news