Palghar Fake Liquor Raid: मद्याच्या बाटल्यांवर बनावट लेबल लावण्याचा कारखाना उद्धस्त

उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; पाच जणांना अटक, दमण बनावटीच्या मद्याचा साठा जप्त
Palghar Fake Liquor Raid
Palghar Fake Liquor RaidPudhari
Published on
Updated on

पालघर : उत्पादन शुल्क विभागाने मोखाडा तालुक्यातील मोखाडा खोडाळा रस्त्यावरील देवबांध परिसरात अवैध मद्य वाहतूकीच्या गुन्ह्यात जप्त केलेल्या टेम्पो चालका कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकून केलेल्या कारवाईत परराज्यातील मद्याच्या बाटल्यांवर बनावट लेबल लाववण्याचा गोरखधंदा उघडकीस आणला.कारवाई दरम्यान दमण बनावटीच्या विदेशी मद्याचे 70 बॉक्स,पिकअप टेम्पो, विविध नामांकित मद्य प्रकारातील बनावट लेबल मिळून 17 लाख 67 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे.

Palghar Fake Liquor Raid
NASA Artemis 2: शंकरपाडा निसर्गशाळेच्या विद्यार्थ्यांची नावे आता चंद्राच्या कक्षेत!

पालघर जिल्ह्या लगतच्या केद्र शासित प्रदेशातुन होणा-या मद्य तस्करीवर आळा घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून सीमा भागात दिवसरात्र गस्त घातली जात आहे. उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक आणि डहाणू निरीक्षक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले पथक शुक्रवारी सायंकाळी मोखाडा तालुक्यातील मोखाडा खोडाळा रस्त्यावर गस्त घालत असताना देवबांध परिसरातील गणपती मंदिरासमोर भरधाव वेगाने जात असलेल्या पिकअप टेम्पोवर संशय आल्याने पथकाने पाठलाग करून टेम्पोची पाहणी केली.

Palghar Fake Liquor Raid
Boisar Tribal Land Encroachment: आदिवासी संरक्षित जमिनीवरील 150 हून अधिक खोल्यांवर प्रशासनाचा हातोडा

टेम्पोच्या लोखंडी दरवाज्याचे कुलूप तोडुन दरवाजा उघडला असता टेम्पो मध्ये दमण बनावटीच्या परराज्यातील मद्याचे खोके आढळून आले.मद्याचा साठा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित व दादरा नगर हवेली, दिव दमन येथे विक्रीसाठी असल्यामुळे मद्य साठा जप्त करुन टेम्पो चालक भोरु खंडू बिन्नर याला ताब्यात घेतले.

Palghar Fake Liquor Raid
Dombivli Mahashivratri: डोंबिवलीत बर्फातून साकारणार पाच दिव्य शिवलिंग प्रतिकृती

आरोपीची चौकशी केली असता आरोपी कडून देवबांध शिवरातील एका राहत्या घराच्या गच्चीवर मद्य साठा असल्याची माहिती मिळाली.माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने संशयीत घराच्या गच्चीवर छापा टाकला असता चार कामगारांकडून महाराष्ट्र राज्यात विक्री करीता असे छापलेले बनावट लेबल परराज्यातील मद्याच्या बाटल्यांवर चिटकवण्याचे काम सुरु असल्याचे आढळून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news